आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fodder Scam File Found After Nine Years In Garbage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नऊ वर्षांनंतर कच-यात सापडली चारा घोटाळा याचिकेची फाइल, लालूप्रसाद अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबाद- बहुचर्चित चारा घोटाळ्यातील आरोपी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी दाखल केलेल्या याचिकेची फाइल नऊ वर्षांनंतर कच-यात सापडली. ही फाइल गहाळ झाल्यामुळे याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता फाइल सापडल्यामुळे लालूप्रसाद यादव आणि अन्य आरोपींना त्यांची बाजू मांडण्यासाठी आयकर विभाग लवकरच नोटीस जारी करण्याच्या तयारीत आहे.
चारा घोटाळा प्रकरणाची चौकशी करत असताना सीबीआयने या आरोपींकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा केला होता. आयकर विभागानेसुद्धा लालूप्रसाद, राबडीदेवी, साधू यादव व काही पुरवठाधारकांना लाखो रुपयांचा आयकर भरण्यासाठी नोटीस जारी केली होती. त्या विरोधात लालूप्रसाद आणि अन्य आरोपींनी 2004-05 मध्ये पाटण्यात याचिका दाखल केली होती. याचिकेच्या वाढत्या संख्येमुळे त्यातील 275 प्रकरणे धनबादच्या आयकर विभागात हस्तांतरीत करण्यात आली होती, परंतु सुनावणी सुरू होण्यापूर्वीच याचिकेची फाइल गहाळ झाली. याचिका आयुक्तांच्या आदेशानुसार विभागीय कर्मचा-यांनी शोधमोहीम राबवली.