आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांकडून मोदी मंदिर स्थापन, दररोज आरतीसोबत नमो-नमोचा जप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सपाटून मार खावा लागला असला तरी नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत कुठलीच कमतरता आलेली नाही. त्यांच्या चाहत्यांनी राजकोटमध्ये मोदी मंदिर बांधले आहे. १५ फेब्रुवारी रोजी मंदिराचे उद्घाटन होणार आहे. मंदिरावर जवळपास ५ लाख आणि मूर्तीवर दोन लाख रुपये खर्च झाले आहेत. देव-देवतांच्या मूर्तीप्रमाणे मोदींच्या मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मंदिरात दररोज पूजा-अर्चा केली जाणार आहे.