आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The Annihilation Of Terrorists, A Group Of 50 Personnel Of The Three Parties Formed

दहशतवाद्यांच्या उच्चाटनासाठी तिन्ही दलांच्या 50 जवानांचे गट स्थापन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/अनंतनाग/ पुलवामा ग्राउंड रिपोर्ट- श्रीनगरच्या लाल चौकातील दुकानांत, रस्त्यांवरही गर्दी आहे. वाहनांमध्ये मोठ्या संख्येने शाळेच्या पिवळ्या बसही आहेत. त्यात कुठे निळे तर कुठे हिरवे ब्लेझर घातलेली मुले बसली आहेत. रस्त्याच्या बाजूला सीआरपीएफचे जवान बुलेटप्रूफ जॅकेट आणि हातात एक-४७ रायफली घेऊन उभे आहेत. दगडफेकीची उल्लेखनीय घटना होऊन काही महिने उलटले आहेत. दीड वर्षांपूर्वी बुरहान वानीच्या एन्काउंटरनंतर काश्मीर धगधगले होते. आता तसे चित्र काश्मीरमध्ये दिसत नाही.


खोऱ्यातील बदलत्या वातावरणाची माहिती घेण्यासाठी मी सर्वात आधी जम्मू-काश्मीर पोलिस दलातील महानिरीक्षक मुनीर खान यांचे कार्यालय गाठले. १९९० च्या दशकापासून दहशतवादाच्या विरोधात हाती घेतलेल्या मोहिमेत मुनीर खान हे प्रामुख्याने सहभागी आहेत. काश्मीरमध्ये या वर्षाच्या सुरुवातीच्या ११ महिन्यांत २०५ दहशतवादी ठार मारण्यात आले. त्याचे विशेष कारण काय, या प्रश्नावर खान म्हणाले की, ‘दहशतवाद प्रामाणिकपणे संपवायचा आहे, असा वरूनच आदेश आहे.’ आपला मुद्दा समजावून सांगताना ते म्हणाले की, परिस्थिती कशीही झाली तरी सुरक्षा दलांचे संयुक्त पथक कारवाई संपवल्याशिवाय मागे परतणारच नाही. गोंधळाला काहीही संधी नाही.


ते दुसरी गोष्ट सांगतात ती म्हणजे लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी जेथे नरमाईचे धोरण उपयुक्त असेल तेथे असेच काम केले जात आहे. दगडफेकीच्या घटनांतील ४,५०० पेक्षा जास्त आरोपींवरील गुन्हे मागे घेणे हेही असेच पाऊल आहे. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांच्यातील समन्वय वाढला आहे. सीआरपीएफचे महानिरीक्षक झुल्फिकार हसन यांनी सांगितले की, तिन्ही दलांचे प्रमुख या नात्याने आम्ही आठवड्यात किमान दोनदा बैठक घेतो. सशस्त्र सीमा दलाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र भुंबला यांनी सांगितले की, स्थानिक स्तरावरही अधिकाऱ्यांमध्ये चांगला ताळमेळ आहे. दहशतवादाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या जिल्ह्यांपैकी दक्षिण काश्मीर या जिल्ह्यात पुलवामात तैनात सीआरपीएफच्या बटालियनचे कमांडर नरेंद्र पाल सिंह म्हणाले की, आमच्या बटालियनने, लष्कराच्या बटालिययने आणि जिल्हा पोलिसांनी आपले-आपले विशेष कारवाई गट तयार केले आहेत. या तिन्ही गटांमध्ये सर्वात ५० कार्यक्षम जवानांचा एक गट तयार केला जातो. कोणतीही सूचना मिळाल्यानंतर पाच मिनिटांत तो कारवाईसाठी तयार असतो. या समन्वयामुळेच गेल्या वर्षीपर्यंत जेथे सरासरी २-३ दहशतवादी ठार होत होते तेथे या वर्षी त्यांनी १९ दहशतवादी ठार केले आहेत.

 

४० जणांपेक्षा जास्त जणांवर कारवाई झाल्याने थांबली दगडफेक
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, टेरर फंडिंगला लगाम घातल्याने दगडफेक कमी झाली आहे. ज्या बँक खात्यांत सतत विदेशी निधी जमा होत आहे, अशा अनेक खात्यांची ओळख एनआयएने काश्मीरमध्ये पटवली आहे. हा निधी कृषी उत्पादने किंवा इतर साहित्याच्या निर्यातीच्या बदल्यात आलेला दाखवण्यात येत होता. फंडिंगमध्ये सहभागी बहुतांश लोक ‘व्हाइट कॉलर’ होते. ते कार्यकर्त्यांच्या मदतीने दगडफेक करणाऱ्यांना पैसे पाठवत होते. आता त्यापैकी बहुतांश लोकांना काश्मीरबाहेरील तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पैशांचा ओघ थांबला. 

बातम्या आणखी आहेत...