आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी जनतेची प्रथमच दहशतवाद्यांवर दगडफेक; आणखी 2 तरुणांनी सोडला दहशतवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/ बेतिया- काश्मीरमध्ये बँक लुटणाऱ्या दहशतवाद्यांवर लोकांनी प्रथमच दगडफेक केली. दुसरीकडे आणखी २ तरुण दहशतवादाचा मार्ग सोडून घरी परतले. काश्मिरमध्ये केंद्र सरकारने प्रथमच दगडफेक करणाऱ्या ४५००  तरुणांवरील खटले मागे घेतले आहेत.    


फक्त ९७ हजार रु. लुटता आले   

चेहरे झाकलेल्या तीन दहशतवाद्यांनी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास नूरपोरा येथील जम्मू-काश्मीर बँक लुटण्याचा प्रयत्न केला. बँकेत येताच त्यांनी हवेत गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या. सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या परिसरातील लोकांना बँक लुटीची घटना समजताच, तेथे लोक जमा झाले. त्यांनी दहशतवाद्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दहशतवादी हवेत गोळीबार करत फरार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी येथील बँकेतून रोकड लुटण्याच्या उद्देशाने आले होते. परंतु स्थानिक लोकांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांना फक्त ९७ हजारांची रक्कम सोबत नेता आली. बँक लुटीच्या या घटनेत अतिरेकी कमांडर झाकीर मुसा व २ इतर सहकाऱ्यांचा समावेश होता.  


अब्दुल्ला व ऋषी कपूर यांच्यावर गुन्हे

काश्मीरवरून पाकिस्तानची भाषा बोलणारे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला व त्यांच्या कॉमेंटवर सहमती  दर्शवणारे  अभिनेता ऋषी कपूर यांच्याविरोधात बिहारच्या बेतिया येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका वकिलाच्या फिर्यादीवरून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

 

खोऱ्यातील आणखी दोन तरुणांनी सोडला दहशतवाद  
कुटुंबीयांच्या आवाहनास प्रतिसाद देत २ तरुण घरी परतले. अनेकांनी हिंसाचार सोडून देण्याचा इरादा जाहीर केला आहे. फुटबॉलपटू माजिद खान घरी परत आला. यानंतर मुख्य प्रवाहात येण्यासाठी तेथील अनेक तरुणांची मानसिकता बदलत चालली आहे. चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही, असे सुरक्षा दलांनी जाहीर केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...