आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्याला लाच: मनोहर पर्रीकर आणि गाेव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून चौकशीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- अमेरिकेतील लुईस बर्जर कंपनीकडून भारतीय अधिकारी आणि गाेव्याच्या एका मंत्र्याला कथित लाच दिल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि गाेव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर असताना एका जलविकास प्रकल्पासाठी लाच देण्यात आली होती. लाच प्रकरणात काँग्रेसच्या दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दोन मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी नावे न घेता केला.

गोवा आणि गुवाहाटीतील जलविकास प्रकल्पांची कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकारी व मंत्र्याला ६.२० कोटी रुपयांची लाच दिल्याबद्दल अमेिरकेच्या कायदा विभागाने लुईस बर्जर कंपनीला दोषी ठरवले आहे. तसेच कंपनीला सुमारे १.०८ अब्ज रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्याय विभागाने ११ पानांच्या आरोपपत्रात मंत्र्याचे नाव जाहीर केलेले नाही.