आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदित्यनाथ यांच्या सभेत महिलेस बुरखा काढण्याची सक्ती; चौकशीचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलिया- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत सहभागी झालेल्या मुुस्लिम महिलेस बुरखा काढण्याची सक्ती केली गेली. जिल्हा प्रशासनाकडे यासंंबंधी तक्रार आल्यानंतर आता दंडाधिकाऱ्यांना याच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. महिलेला बुरखा काढण्याची सक्ती केल्याचा व्हिडिआे सोशल मीडियात प्रसारित झाला. असा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवून घेतली असून यासंबंधी चौकशीचे आदेश जारी केले आहेत, असे जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र विक्रम यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असून त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे आले होते. त्यांच्या सभेसाठी सायरा नामक महिला आली होती. महिला कॉन्स्टेबलने सायराला बुरखा काढण्यास सांगितले. आपण भाजप कार्यकर्त्या असून आपल्या गावातून खास सभेसाठी येथे आल्याचे सायराने सांगितले. मात्र बुरखा काढण्याविषयी कॉन्स्टेबल आग्रही होती. 


पोलिस अधीक्षक अनिलकुमार यांनी सांगितले की, संबंधित महिला कॉन्स्टेबलची विभागांतर्गत चौकशी सुरू केली आहे. व्हिडिआे पोलिस विभागाकडे आला आहे. रॅलीमध्ये काळे झेंडे दिसता कामा नयेत, असे आदेश पोलिस विभागाला देण्यात आल्याने ही घटना घडली असावी, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...