आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरच्या 20 गावांमध्ये व्यापक मोहिमेला सुरुवात, जवानांचे शिरच्छेद करणाऱ्यांना प्रत्युत्तर देऊ: लष्करप्रमुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पकडण्यासाठी २० गावांत नाकेबंदी करून व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. श्रीनगरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलास तैनात करण्यात आले आहे. राज्यात अलीकडे दहशतवाद्यांनी बँक लूट व हल्ले केले होते. त्या पार्श्वभूमीवर शोपिया, पुलवामामधील मोहीम महत्त्वाची मानली जाते.  
 
दहशतवाद्यांनी काही घटनांत सुरक्षा दलाकडील शस्त्रे पळवली होती. त्यामुळेच अशा दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल घराघरात जाऊन त्यांचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर दक्षिण काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवादी उमर मजिदबद्दलची माहिती देणाऱ्यांना १० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचीदेखील घोषणा करण्यात आली आहे. मजिदनेच सोमवारी कुलगाममध्ये पाच पोलिस व बँकेच्या दोन सुरक्षा रक्षकांसह सात जणांच्या हत्येचा कट रचला होता. शोपियामध्ये मोहिमेदरम्यान गर्दीने सुरक्षा दलावर दगडफेक केली. 
 
शोपियाच्या सहा गावांत दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. शोपिया व पुलवामामध्ये सर्वाधिक बँक लुटीच्या घटना घडल्या आहेत. ही मोहीम बुधवारी रात्रीपासून सुरू आहे. बुधवारी रात्री शोपिया पोलिस स्थानकातून दहशतवादी पाच रायफल लुटून घेऊन गेले होते. त्यात एके-४७ चादेखील समावेश आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांच्या एका मोठ्या गटाने व्हिडिआे सोशल मीडियावर पोस्ट केला होता. सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिआे शोपियात चित्रित करण्यात आला होता. काश्मीरमध्ये २२ सोशल मीडिया संकेतस्थळांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्याशिवाय बनावट सर्व्हरच्या माध्यमातून काश्मीरमध्ये अशा प्रकारची संकेतस्थळे सुरू ठेवण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.  
 
सात महिन्यांत १३ घटना  
गेल्या सात महिन्यांत दहशतवाद्यांनी बँक, एटीएम व बँक व्हॅनमधून लूट केल्याच्या १३ घटना घडल्या. अशा विविध घटनांतून १ कोटीहून अधिक रक्कम लुटण्यात आली. दक्षिण काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या १३ घटना घडल्या आहेत. त्यातही पुलवामा, कुलगाम, अनंतनाग, शोपिया व बडगाम जिल्ह्यांतील बँकांचा समावेश आहे.  
 
सोपोरमध्ये उपद्रवानंतर बंद
उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल व विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. परिसरात सर्व कार्यालये व दुकाने बंद करण्यात आली होती. उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर धुमश्चक्रीला सुरुवात झाली होती. हे विद्यार्थी सुरक्षा दलावर कारवाई करण्याची मागणी करत होते. विद्यार्थ्यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरक्षा दलास अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना पांगवावे लागले. त्यानंतर बराच वेळ वाहतूक बंद होती.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, जवानांचे शिरच्छेद करणाऱ्यांना प्रत्युत्तर देऊ : लष्करप्रमुख...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...