आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Foreign Artists Enjoy In Surajkund Fair In Faridabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : सूरजकुंड मेळ्यात देशी तालावर थिरकले परदेशी कलाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - रशियाच्या कजानचे क्रिस्टल लोकनृत्य.
फरीदाबाद - सूरजकुंड मेळ्यात सोमवारी दर्शकांना विविध संस्कृतींचा संगम पाहायला मिळाला. परदेशी कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण करत वातावरणात रंग भरले. हरियाणा, जम्मू, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या कलाकारांनीही मनमोहक सादरीकरण केले. उपस्थितांनी शिट्या आणि टाळ्यांनी दाद दिली.
सोमवारी देश विदेशातील 20 डान्स ग्रुपच्या 200 हून अधिक कलाकारांनी सादरीकरण केले. छत्तीसगडच्या सरदुल नृत्याने सुरुवात झाली. त्यानंतर परदेशी कलाकारांनी उपस्थितांनी मने जिंकली रशियाच्या कजान, ततरस्तान, रिपब्लिक ऑफ वशपोस्तानचे सादरीकरणही उत्कृष्ट होते. तर उझबेकिस्तान आणि बेलारूसच्या डान्सर्सनीही उत्कृष्ट सादरीकरण केले. हरियाणा, मध्यप्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात, यूपी आणि छत्तीसगडच्या कलाकारांनीही एकापेक्षा एक सरस कलाकृती सादर केल्या.

परदेशी नृत्य
कजानचे लोकनृत्य क्रिस्टल
रशियाच्या ततरस्तानच्या कजानमद्ये हे नृत्य केले जाते. वर्कर ऑफ कल्चर ऑफ ततरस्तान रिपब्लिक येथील स्वेतलाना इश्कुजिना हिने दिलेल्या माहितीनुसार, तरुण वेळ घालवण्यासाठी तसेच विद्यार्थी छंद आणि फिटनेससाठी नेहमी हे नृत्य करतात. यात दोरिवरच्या उड्या आणि बेली डान्सचा संगम पाहायला मिळतो.
बेलारूस चे बेलियारूस
रशियामधून बाहेर पडलेल्या या छोट्याशा देशात या नृत्याची धूम असते. या पथकाबरोबर आलेल्या यानाच्या मते, आनंदाच्या क्षणी सादर केले जाणारे हे नृत्य बेलारूसच्या संस्कृतीचे दर्शन घडवते.
उझबेकिस्तान
येथे अनेत वर्षांपासून केल्या जाणाऱ्या पारंपरिक नृत्याने कलाकारांनी कार्यक्रमात रंग भरले. आनंदाच्या क्षणी आणि विवाहांत हे नृत्य केले जाते.

भारतीय लोककला
मध्यप्रदेशच्या कलाकारांनी बधाई नृत्याद्वारे परदेशी कलाकारांशी ताळमेळ बांधला. हे लोकनृत्य सुरू झाले तेव्हा परदेशी कलाकारांनीही ठेका धरला होता. तसेच हरियाणाच्या कलाकारांनी होळी आणि फाल्गुन महिन्यात केले जाणारे फाग नृत्य सादर केले. जम्मूच्या कलावंतांनी कुठ नृत्य सादर केले. प्रथमच जम्मूचे लोकनृत्य याठिकाणी सादर झाले. गुजरातच्या पथकाने आदिवासी देवाला साकडे घालण्यासाठी करतात ते सिद्धीगोमा नृत्य सादर केले. मुस्लिम समुदायाचे लोक हे नृत्य सादर करतात. युपीच्या कलाकारांनी मयूर रासलीला सादर केली. यात कृष्णाच्या लीलांचे सादरीकरण करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाह, विविध नृत्यांचे PHOTO