आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 25 व्या वर्षी सुषमा स्वराज झाल्या होत्या मंत्री, \'लिम्का बुक\'मध्ये पतीची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पती कौशल स्वराज यांच्यासोबत सुषमा स्वराज)
अंबाला- हरियाणा राज्यात भ्रूणहत्येत‍ वाढ झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानास प्राधान्य देण्यात येत आहे. येत्या 22 जानेवारीला हरियाणात 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानास प्रारंभ होणार आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येत आहेत.

दुसरीकडे, हरियाणातील काही कन्या देशात विविध क्षेत्रात चकमल्या आहेत. देशाच्या विकासासाठी त्या आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करत आहेत. त्यात विद्यमान केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. सुषमा स्वराज या हरियाणात अंबाला येथील रहिवासी आहेत.

सुषमा सगळ्यात कमी वयात बनल्या मंत्री
सुषमा स्वराज यांनी वयाच्या 25 व्या वर्षी हरियाणात कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. उल्लेखनिय म्हणजे दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाची माळही त्यांच्याच गळ्यात पडली होती. सुषमा स्वराज या मध्य प्रदेशातील विदिशा मतदार संघाच्या खासदार आहेत.
सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी, 1952 ला अंबाला येथे (हरियाणा) झाला. सुषमा स्वराज यांचा जन्म आणि विवाहाची तारीख एकच आहे.

सुषमा स्वराज पंधराव्या लोकसभेत विरोधीपक्ष नेतेपद भुषविले होते. सुषमा सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री आहेत. तसेच संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षाही आहेत. भारतीय जनता पक्षातील एक प्रमुख रणनीतीकार म्हणून सुषमा स्वराज यांची ओळख आहे. सुषमा स्वराज या तीनदा विधानसभा सदस्य तर सहा वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निवडक फोटो...