फोटो - परदेशी तरुणी
पुष्कर - जगभरात प्रसिद्ध असलेल्या पुष्कर मेळ्याचा उत्साह सध्या शिखरावर पोहोचला आहे. 31 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हा मेळा आणखी गोन दिवस चालणार आहे. त्यामुळे यामध्ये येणा-यांमध्ये पर्यटकांचे प्रमाणेही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने या मेळ्यात सहभागी होत असतात. त्यांचीही चांगलीच गर्दी मेळ्यात दिसून येत आहे.
मेळ्यात पहिल्या दिवशी प्राण्यांची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेने सर्वांचीच मने जिंकली. सोमवारी एकादशीच्या मुहूर्तावर धार्मिक मेळ्याला सुरुवात झाली.
परदेशी पर्यटकांचा मेळ्यातील उत्साह सर्वांना चकीत करणारा असा आहे. यावर्षी अत्यंत मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक मेळ्यात सहभागी झाले आहेत. परदेशी पर्यटक प्राण्यांबरोबर आणि स्थानिक नागरिकांबरोबर विविध खेळांमध्ये सहभागी होत असून, मेळ्याची रंगत आणखी वाढवत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, परदेशी पर्यटकांचे PHOTO