आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शो रद्द झाल्याने संतापले विदेशी रेसलर्स, खलीच्या विद्यार्थी आणि भावाला केली मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जलंधर - जलंधरमधील रेसलर खलीच्या अकादमीमध्ये अमेरिकेच्या रेसलर्सने तोडफोड केली. तसेच खलीची महिला विद्यार्थी आणि त्याच्या भावाला मारहाणही केली. गुडगावमध्ये काही दिवसांपूर्वी फाइट होणार होती. पण ती काही कारणास्तव रद्द झाली. त्यामुळे संतापलेले अमेरिकन रेसलर्स खलीच्या अकादमीत आले होते. खली भेटला नाही म्हणून त्यांनी तोडफोड केली.

असा सुरू झाला गोंधळ..
- खलीच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, ते सकाळी प्रॅक्टीस करत होते. कारण शनिवारी गुडगावमध्ये त्यांची रेसलिंग मॅच होती.
- पण शो कॅन्सल झाल्याने ते सर्व अॅकॅदमीच प्रॅक्टीस करत होते.
- त्याचवेळी अचानक एका गाडीतून अमेरिकन रेसलर्स आले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
- अमेरिकन रेसलर्सनी दिनेश, आर्या जेन, जोसन, हरमन, शँकी आणि बीबी बूलबूल यांच्याबरोबर वाद घातल्याचे त्यांनी सांगितले.

खली भेटला नाही म्हणून विद्यार्थ्यांशी बाद घातला
- माइक नोक्स, रोब टेरी, ब्रूडी स्टील, माइक टारवान, रेबल, केटी आणि जेमी जेस यांनी मारहाण केल्याचे सुपर खालसाने सांगितले.
- ते याठिकाणी खलीशी भांडायला आले होते. पण खली भेटला नाही म्हणून त्यांनी इतरांशी वाद घातल्याचे सांगितले.
- सूपर खालसाने सांगितले की, खलीला शोधताना त्यांनी इतरांशी वाद घातला.
- अमेरिकन रेसलर्सने अकॅडमीतील सप्लिमेंटस तोडले, एलसीडी, फायटिंग इन्स्टुमेंट्स आणि काचा फोडल्या.
- पोलिसही घटनास्थळी आले पण कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, खलीच्या अकॅडमीत तोडफोड करणाऱ्या अमेरिकेच्या रेसलर्सचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...