आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्करमध्ये विदेशी जोडपे असे करतात एन्जॉय, क्लिक झाले हे फोटोज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर- पुष्कर सरोवरात कार्तिकी एकादशीपासून सूरू झालेल्या पंचतीर्थ स्नानाच्यादुसऱ्या दिवशीही तीर्थ नगरीमध्ये भावीकांनी गर्दी केली होती. बुधवारी यात्रेतील साफा बांधो कॉम्पिटीशन विदेशी पाहूण्यांसाठी खास राहिले. यामध्ये 14 विदेशी जोडप्यांनी सहभाग घेतला. यात विदेशी महिलांनी आपला पती किंवा प्रियकराच्या डोक्यावर राजस्थानी साफा बांधून टीळा लावला. ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांनी संपुर्ण स्टेडिअमर भरून गेले होते. स्पर्धेत जर्मनीहून आलेला गृप पहिल्या, तर पॉलंडहून आलेला गृप दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तीन विजेत्या जोडप्यांना बक्षिसही देण्यात आले.

शान-ए-मूंछ स्पर्धा...
- बुधवारी यात्रा स्टेडियममध्ये शान-ए-मुंछ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रोमांचक स्पर्धेत पाच विदिशी पर्यटकांसह एकून 11 मिशीवाल्या लोकांनी सहभाग घेतला होता.
- सर्व स्पर्धकांनी एकानंतर एक आपल्या मिशांचे दर्शकांसमोर प्रदर्शन केले. 
- यामध्ये अजमेरचे मोहन सिंह उर्फ रावण सरकार यांनी रावणाच्या स्टाईलने हसत मिशांना ताव दिला, यावर विदेशी पर्यटकांनी जोरजोराने टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. स्पर्धेत डीडवाना तालुक्यातील जगदीश सिंह चौहान यांनी बाजी मारली.

यात्रेत होत आहे पुर्व-पश्चिम संस्कृतिचे संगम...
यात्रेत ग्रामीण आणि विदेशी पर्यटकांच्या गर्दीमुळे पुष्करमध्ये सध्या पुर्व-पश्चिम संस्कृतीचा संगम पहायला मिळत आहे. यात्रेच्या ठिकाणी विदेशी पर्यटक मोठ्या संखेने हजेरी लावत आहेत.

सर्व फोटोज : भीकम शर्मा
 
पुढील स्लाइडवर पाहा यात्रेतील निवडक फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...