आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांपेक्षा योगात विदेशी अधिक मेहनती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - भारतानेच जगाला योग दिला. आपल्याच लोकांनी विदेशात योगासन शिकवले. आपण योगाचे जनक असतानासुद्धा भारताकडे चांगल्या योग शिक्षकांची कमी आहे. ही उणीव दूर होण्यासाठी योगाचा अधिकाधिक प्रचार-प्रसार केला पाहिजे, असे मत पाच वेळेसची योग वर्ल्ड चॅम्पियन मनदीप कौरने सांगितले. एका कार्यक्रमात मनदीप बोलत होती. योगासनला शाळेत सक्तीचे केले पाहिजे. आपण असे केले नाही तर लहान मुलांना योगासनाची आवड होणार नाही,असेही मनदीपने नमूद केले. भारतानेच जगाला योग दिले असले तरीही यात मेहनत घेण्यात भारतीयांपेक्षा विदेशी पुढे आहेत, असे ती म्हणाली. मनदीप हॉट योगात तरबेज आहे. हॉट योगा एक खास प्रकारचे योगासन आहे. हे ४० डिग्री तापमानात केले जाते.

योगाने दिले नवे जीवन
मनदीप आणि तिचा १० वर्षांचा मुलगा असे तिचे कुटुंंब आहे. ती सिंगल मदर आहे. वयाच्या २२ व्या वर्षी लग्न करणाऱ्या मनदीपला एक वर्षाने मोठा धक्का बसला. एका अपघातात तिच्या पतीचे अपघाती निधन झाले. यानंतर जणू काही जीवन थांबले होते. तिच्यासोबत ३ महिन्यांचा मुलगा होता. सासुरवाडीचे लोक दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते. मी पुढचे जीवन माझ्या मुलासोबत घालवेल, असा निर्णय तिने घेतला. ती आपल्या निर्णयावर आजही कायम आहे. मी एकटीने मुलाचे संगोपन केले, असे ती म्हणते. मी आज जी काही आहे ती योगामुळे आहे, असेही मनदीप म्हणते.

कोणाला घाबरले नाही
मला कधीच भीती वाटली नाही. गावात जन्म झाला. वडील सेनेत होते. मी मुलगी असल्याने आई मला काहीच करू देत नव्हती. मी शाळेत व्हॉलीबाॅल खेळण्यास सुरुवात केली. प्राचार्यांनी योग करण्याचा सल्ला दिला. त्या वेळी फार मेहनत न घेता मी तिसरे स्थान पटकावले. मी खुश झाले. यानंतर योग माझे जीवन बनले, असे मनदीप म्हणाली. मनदीप मुंबईत अव्वल योग शिक्षकांपैकी एक आहे. चित्रपट निर्माती एकता कपूर, जॅकलिन फर्नांडिसने तिचे मार्गदर्शन घेतले आहे.
बातम्या आणखी आहेत...