आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद: 3BHK फ्लॅटमध्ये सुरु होती गांजाची शेती, LED लाइट्स, AC ने राखले जात होते टेम्परेचर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - एका माजी बँक कर्मचाऱ्याला 3BHK फ्लॅटमध्ये गांजाची शेती करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. 33 वर्षांचा आरोपी 40 कुंड्यांमध्ये मारिजुआनाची (गांजा) रोपे वाढवत होता. मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीचे नाव सैय्यद हुसैन आहे. त्याने बेकायदेशीर पद्धतीने गांजाची शेती करण्याचे ऑनलाइन ट्रेनिंग घेतले होते. यासाठी त्याने त्याच्या घरातील दोन बेडरुमचा वापर केला होता. 
 
कशी करत होता गांजाची शेती 
- सैय्यद हुसैन हैदराबादमधील मनीकोंडा भागातील फ्रेंड कॉलनीमध्ये राहातो. 
- येथूनच तो गांजाची विक्री देखिल करतो. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा सैय्यद एका व्यक्तीला गांजा विक्री करत होता.
- पोलिसांनी त्याच्या फ्लॅटमधून गांजाची 40 रोपे जप्त केली. 
- सैय्यदने गांजाची शेती करण्यासाठी फ्लॅटमध्ये आर्टिफिशियल टेम्परेचर राहाण्यासाठी यंत्रणा तयार केली होती. त्यासाठी त्याने LED लाइट्स, टेबल फॅन आणि एसीचा वापर केला होता. 
- रोपांच्या वाढीसाठी तो फॉस्फोरस आणि पोटॅशियम यांचा वापर करत होता. 
- सैय्यद हुसैनने हे तंत्रज्ञान फेसबुक फ्रेंडकडून अवगत केले होते. त्याचा मित्र अमेरिकेत राहातो. 
 
पोलिसांनी काय-काय जप्त केले
- 8.6 किलोग्रॅम गांजा. 
- गांजाची 40 रोपे. 
- वजन करण्याचे एक यंत्र.
- तीन एलईडी लाइट्स.
- एक टेबल फॅन. 
 
केव्हापासून सुरु होता गोरख धंदा 
- पोलिसांच्या माहितीनुसार, सैय्यद हुसैन आधी बँकेत काम करत होता. 
- तीन महिन्यांपासून त्याने राहात्या घरात गांजाची शेती सुरु केली होती. 
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...