आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानव्याप्त काश्मीरआधी लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवून दाखवा- फारूक अब्दुला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. केंद्राने पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याआधी श्रीनगर शहरातील लाल चौकात तो फडकवावा, असे आव्हान अब्दुल्ला यांनी केंद्राला दिले. अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर भाजपने टीका केली आहे. नॅशनल कॉन्फरन्स फुटीरतावादी व अतिरेक्यांना बळ देत आहे. तिरंगा लाल चौकासह राज्यातील विविध भागात फडकला असल्याचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी सांगितले.  


पाकव्याप्त काश्मीर(पोओके) भारताचा भाग होऊ शकत नाही. पीओकेबाबत आपण जे बोलतो ती वस्तुस्थिती आहे, असा दावा  अब्दुल्ला यांनी अलीकडेच केला होता.त्यावरून वाद निर्माण झाला होता.  अब्दुल्ला म्हणाले, ते(भाजप व केंद्र) पीओकेमध्ये तिरंगा फडकवण्याबाबत बोलतात. मी त्यांना प्रथम लाल चौकात तिरंगा फडकवण्यास सांगू इच्छितो. त्यांना हे जमू शकले नाही आणि आता ते पीओकेबाबत बोलत आहेत. तुम्हाला सत्य ऐकायला आवडत नसेल तर असत्यात राहा. 
पाकव्याप्त काश्मीर आपला आणि जम्मू-काश्मीर त्यांचा भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे सांगत असताना अब्दुल्ला यांनी आपल्या मताचे समर्थन केले. काँग्रेस नेते दिवंगत जी.एल. डोग्रा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

 

‘शांततेचा दावा करणाऱ्या केंद्रालाच प्रश्न विचारा’
तुमच्या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावत नाहीत का, या प्रश्नावर अब्दुल्ला यांनी तुम्ही मला भारतीय समजत नाही का, असा प्रतिप्रश्न केला. सुटीवर असलेल्या जवानाच्या हत्येबाबत प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी नोटबंदीनंतर काश्मीरमध्ये शांतता निर्माण झाल्याचा दावा करणाऱ्या केंद्राला हा प्रश्न विचारावा, असे सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...