आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Chief Shama Bano Of Barmer, Rajastan. Latest News In Marathi

बुरखा आणि चार भिंतीच्या बाहेर निघून ही मुस्लिम महिला बनली सरपंच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शमा बानो - Divya Marathi
शमा बानो
'सेल्फी विथ डॉटर', ही हरियाणातील एका सरपंचाची आयडिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडली. कुटुंब आणि देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या मुली प्रत्येक राज्यात आहेत. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला अशाच एका मुलीचा परिचय करून देणार आहोत.

राजस्थानातील एक मुस्लिम महिला. तिने एलएलबीपर्यंत शिक्षण घेऊन गावाची सरपंच बनली. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या महिला सरपंचाची प्रशंसा केली होती.
राजस्थानातील रेगिस्तानात पाकिस्तानच्या सीमेला लागून एक मुस्लिम बहुल गाव आहे. या गावातील मुली शाळेत जात नाहीत. मात्र, एक मुलगी शिकते. एलएलबी करते आणि राजकारणात उतरुन गावाची सरपंच होते, हे एक स्वप्नवत आहे. या महिलेने बुरखा आणि घराच्या चार भिंतीच्या बाहेर निघून एलएलबी करून राजकारणाच्या माध्यमातून समाज सेवा करण्याचा मार्ग निवडला. शमा बानो असे या महिलेचे नाव आहे. राजस्थानातील बारमेड या गावाच्या त्या सरपंच होत्या. सध्या त्या समाजसेवा करत वाहे. या परिसरात अल्पसंख्यक गटातून पहिल्या सरपंच होण्याचा मानही शमा यांनाच जातो.
शमा यांचे पती गफूर अहमद हे देखील राजस्थान सरकारचे राज्य मंत्री होते. तसेच शमा या राजस्थान कॉंग्रेसचे दिग्गज मुस्लिम नेते अब्दुल हादी यांच्या नातेवाइक आहेत. एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर शमा यांनी समाजसेवेचे व्रत स्विकारले. आपल्या परिसरात शिक्षण आणि पंचायती राज सक्षम बनवण्यासाठी विशेष कार्य केले. राज्य सरकारच्या विशेष पथकासोबत शमा यांनी विदेश दौराही केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, शमा बानो यांचे निवडक फोटो...