आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former High Court Judge Ajit Singh Bains Write Letter To 34 Judges

..आणि तुम्ही 14 जज मात्र जस्सीला मृत्यूच्या दाढेत सोडून गेले : जस्टिस बैंस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - सामान्यत: न्यायमूर्ती लोकांना कायद्यानुसार काम करण्याचा सल्ला देतात. पण जेव्हा तेच असे करत नसतील तर काय होईल? काहीशी अशीच घटना अमृतसरमध्ये समोर आली. २८ मार्चला जसविंदरसिंह जस्सीने आत्महत्या केली होती. तीही भर सभेत. तेथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल यांच्यासह लहानमोठे १४ न्यायमूर्ती उपस्थित होते. वकील आणि कायदा अधिकार्‍यांसह ३४ लोकही होते. पण आता या प्रकरणी पोलिसांना ठोस पुरावाच मिळत नाही. अखेर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अजितसिंह बैंस यांनी सर्व ३४ जणांना पत्र लिहिले. पत्र तीन पानांचे आहे. त्यातील प्रमुख अंश....

न्यायाधीश महोदय, तुमच्यासमोर जसविंदरसिंह जस्सीने आत्महत्या केली. कायद्यानुसार तुम्ही तक्रार दाखल करायला हवी होती. तुम्ही तेही केले नाही व आता त्याची साक्षही द्यायला तयार नाहीत. कारण काय? तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहात. एक तरुण तडफडत असताना तुम्ही तिथून निघून गेलात. तुम्ही हायकोर्टाचे न्यायाधीश एम. जियापॉल यांच्याप्रमाणे शौर्य दाखवावे. त्यांनी सुखना तलावात आत्महत्या करायला निघालेल्या अल्पवयीन मुलीला जीव धोक्यात घालून वाचवले. तुमच्या वागण्यामुळे लोकांमध्ये असा संदेश गेला की, आरोपी इतके शक्तिशाली आहेत की सर्वोच्च न्यायालयाचे जजदेखील साक्ष द्यायला घाबरत आहेत. जस्सीने त्यांच्यासमोर आत्महत्या केली होती. मुद्दा येथेच संपत नाही. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींची रिमांड मागितली तेव्हा मुख्य न्याय दंडाधिकार्‍यांनी रिमांड देण्यास नकार दिला. सीजेएमनी तर हा खटला ऐकून मोठी चूक केली. प्रत्यक्षात सीजेएम प्रत्यक्ष हजर होते. तरीही ते जज म्हणून या खटल्याची सुनावणी कशी काय करू शकतात? त्यांनी साक्षीदार व्हायला हवे होते. या प्रश्नांची उत्तरे तुम्हा लोकांना द्यावीच लागतील. सर्वसामान्य नागरिकाने साक्षीदार व्हावे अशी तुमची अपेक्षा. तुमच्यावर वेळ आल्यानंतर माघार का ?
(जस्टिस बैंस पंजाब मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत.)

सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे जज घटनास्थळी होते हजर
२८ मार्चला रेग्युलेटरी फ्रेमवर्क अँड डिस्प्युट रिझोल्युशन टेलीकॉम ब्रॉडकास्टिंग अँड केबल सर्व्हिस सेक्टर (टीडीएसएटी) या विषयावर बैठक सुरू होती. टीडीएसएटीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आफताब आलम, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सतीशकुमार मित्तल उपस्थित होते. जस्सीने सर्वांसमोर घडला प्रसंग सांगितला. सर्वांनी टाळल्याने त्याने विष घेतले.