आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीनंतर 8 दिवसांत न्या. कर्णन यांना अटक, 42 दिवस होते गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
काेलकाता - ४२ दिवसांपासून फरार असलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सी. एस. कर्णन यांना प. बंगाल सीआयडी पथकाने मंगळवारी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये 
अटक केली.  अवमानप्रकरणी सुप्रीम काेर्टाने त्यांना ९ मे रोजी सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. १२ जूनला ते निवृत्त झाले. त्यानंतर आठच दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली. कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या २० न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
 
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जस्टिस कर्णन यांचे वकील पीटर रमेश यांनी तमिळनाडू येथून या अटकेबद्दल अधिकृत दुजोरा दिला आहे. 

- विशेष म्हणजे, 9 मे रोजी सुप्रीम कोर्टाने जस्टिस कर्णन यांच्या विरुद्ध तातडीने अटकेचे आदेश बजावले होते. तेव्हापासूनच ते गायब झाले होते. कित्येक दिवस पश्चिम बंगालमध्ये त्यांचा पत्ताच लागला नाही. 

- 11 मे रोजी बंगाल पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक पथक चेन्नईला रवाना केले. पोलिसांचे हे पथक जस्टिस कर्णन यांच्या तामिळनाडूतील निवासस्थानी पोहचले होते. मात्र, तेव्हाही त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. त्यावेळी पोलिसांनी कर्णन यांच्या मुलाची चौकशी केली होती. 

- सुप्रीम कोर्टाने कर्णन यांना शिक्षा सुनावली त्यावेळी ते चेन्नई येथील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. मात्र, अटकेचे आदेश येताच ते गायब झाले होते. 
बातम्या आणखी आहेत...