आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा घोटाळाप्रकरणी माजी खासदारासह दहा जण दोषी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - बहुचर्चित चारा घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने माजी खासदार आर. के. राणांसह दहा जणांना दोषी ठरवले आहे, तर दोन आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. या दोषी आरोपींना कोर्ट सोमवारी शिक्षा सुनावणार आहे. दोषी आरोपींमध्ये माजी खासदार आर. के. राणांसह माजी आमदार ध्रुव भगत, दुमकाचे माजी विभाग संचालक डॉ. ओमप्रकाश दिवाकर यांचा समावेश आहे.

गोड्डाचे तत्कालीन पशुपालन पदाधिकारी व अन्य चारा उत्पादकांनी मिळून कोशागारातून 37 लाख रुपयांची रक्कम अवैध मार्गाने काढून ती हडपल्याचा आरोप आहे. हा घोटाळा 1995-96 मध्ये झाला होता. प्रत्यक्षात त्यासाठी 1 लाखाचीच रक्कम राखीव ठेवली होती. न्यायालयाने ज्या दहा व्यक्तींना दोषी ठरवले, त्या सर्वांना ताब्यात घेऊन तुरुंगात पाठवले आहे. चारा घोटाळा प्रकरणात एकूण 63 गुन्हे दाखल करण्यात आले होते.