आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former MP Arrested For Molestation Of Girl In Train

मद्यधुंद माजी खासदार विनातिकीट चढले ट्रेनमध्‍ये, तरुणीची काढली छेड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- महिलांवर होणा-या अत्‍याचारांविरोधात कडक कायदा करण्‍यासाठी देशाचे राजकीय पक्ष संसदेमध्‍ये मंथन करीत आहेत. परंतु, एका राजकीय पक्षाचाच नेता आणि एका मंत्र्याच्‍या मुलामुळे राजकारणावर शिंतोडे उडाले. उत्तर प्रदेशचे माजी खासदार चंद्रनाथ सिंह यांना रेल्‍वेमध्‍ये एका तरुणीची छेड काढल्‍याच्‍या आरोपात अटक करण्‍यात आली आहे.

चंद्रनाथ सिंह हे समाजवादी पार्टीचे माजी खासदार आहेत. त्‍यशंनी पद्मावत एक्‍स्‍प्रेसमध्‍ये वेटींग तिकीट घेऊन एसी टू टीयर बोगीमध्‍ये चढले. टीटीने त्‍यांना वेटींग तिकीटाचे नियम सांगितले. परंतु, सिंह यांनी टीटीसोबतच वाद घातला. एवढेच नव्‍हे तर एसी डब्‍यातील एका मुलीसोबतही त्‍यांनी छेडखानी केली. सिंह हे त्‍यावेळी मद्यधुंद होते. रेल्‍वेमध्‍ये गोंधळ घातल्‍यानंतर पोलिसांनी त्‍यांना जसे ताब्‍यात घेतले, तशी त्‍यांची तब्‍बेत बिघडली. त्‍यानंतर त्‍यांना शाहजहापूर येथील शासकीय रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले.

दुसरीकडे, ओडीशाचे कायदा मंत्री रघुनाथ मोहंती यांचा मुलगा राजश्री याला अटक करण्‍यात आली आहे. हुंड्यासाठी पत्‍नीचा छळ केल्‍याचा त्‍याच्‍यावर आरोप करण्‍यात आला आहे. त्‍याची पत्‍नी वर्षा हिने 14 मार्च रोजी पती, सासू-सास-यांसह 4 जणांवर आरोप केला आहे. राजश्री आणि वर्षा यांचा विवाह 8 महिन्‍यांपूर्वी झाला होता.