आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Odisha Law Minister Raghunath Mohanty Arrested In Dowry Torture Case

हुंड्यासाठी सुनेचा छळ करणा-या ओडीशाच्‍या माजी मंत्र्याला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुंड्यासाठी सुनेचा छळ करत असल्‍याच्‍या आरोपाखाली ओडीशाचे माजी कायदा आणि नगरविकास मंत्री रघुनाथ मोहंती यांना शनिवारी सकाळी अटक करण्‍यात आली आहे. सुनेने यासंदर्भात तक्रार केल्‍यानंतर मोहंती यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मोहंती यांना पत्‍नीसह कोलकाता येथून अटक करण्‍यात आली आहे.

मोहंती यांची सून वर्षा हिने आपला हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मोहंती यांनी राजीनामा दिला होता. नैतिक कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्‍यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

मोहंतींचा मुलगा राजाश्री याच्याबरोबर वर्षाचा २४ जून २०१२ रोजी विवाह झाला होता. लग्नात आपल्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांना १० लाख रुपये आणि घरगुती वापराचे सामान असा हुंडा दिला होता. त्यानंतरही सासू प्रितीलता, पती राजाश्री आणि सासरे रघुनाथ मोहंती यांनी आपल्याला माहेरकडून २५ लाख रुपये रोख रक्कम आणि स्कॉर्पियो गाडी आणण्यासाठी छळ केला, असे वर्षाने दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे. हुंड्यासाठी सासरी छळ होत असल्याने वर्षा १३ मार्चपासून माहेरी राहण्यास गेल्या. तसेच त्यांनी सासरच्या लोकांनी आपले अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोपही केला होता.