आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Pakistan PM Benazir Bhutto Visited Shimla

ही आहे तारुण्यातील बेनझीर भुट्टो, सिमल्यात मागे लागला होता तरुणांचा घोळका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला (हिमाचल प्रदेश)- भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सिमला कराराला आज (गुरुवार) 43 वर्षे पूर्ण झाली. यावेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची मुलगी बेनझीर त्यांच्यासोबत सिमल्याला आली होती. त्यावेळी बेनझीर केवळ 19 वर्षांची होती. येथे आल्यावर तिने पाकीजा चित्रपट बघितला. मालरोडवर फिरायला निघाली तेव्हा तरुणांचा घोळका तिच्या मागे लागला होता.
जुल्फिकार अली भुट्टो यांना सिमला खुप आवडायचे. 1972 मध्ये भारत पाकिस्तान सिमला शिखर बैठकीसाठी त्यांची पत्नी नुसरत सोबत येणार होती. परंतु, प्रकृती अस्वस्थामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे जुल्फिकार भुट्टो मुलगी बेनझीरला घेऊन आले होते. यावेळी ती अमेरिकेत शिकत होती. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पाकिस्तानमध्ये आली होती.
सिमल्यात बघितला 'पाकिजा'
पहिल्यांदा वडीलांसोबत इंदिरा गांधी यांना भेटली तेव्हा बेनझीरने लाल साडी नेसली होती. लाल रंगाचे लिपस्टिकही लावले होते. तिचे केस लांबसडक होते. पाकिस्तानी शिष्टमंडळातील सचिव खालिद हसन यांना बेनझिरची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हसन कायम बेनझीरसोबत राहत. यावेळी तिला सांगण्यात आले होते, की कोणत्याही मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलू नकोस. हट्ट केल्याने हसन बेनझीरला एका टॉकिजमध्ये घेऊन गेले होते. तेथे त्यांनी पाकिजा चित्रपट बघितला होता.
मालरोडवर बेनझीरच्या मागे लागला तरुणांचा घोळका
बेनझिर सिमल्याला येणार असल्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून आल्या होत्या. सिमल्यात आल्यावर वडीलांसोबतचे फोटोही झळकले होते. त्यामुळे सिमल्यात ती चर्चेचा विषय ठरली होती. हसन यांच्यासोबत सेक्युरिटी न घेता जेव्हा बाहेर पडायची लोक बेनझीरला ओळखायचे. तिच्या मागे लागायचे. पाठलाग करायचे. त्यावेळी झुल्फिकार यांच्यापेक्षा बेनझीरची जास्त चर्चा सुरु होती, असे हसन यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. या घोळक्यात काही पत्रकारही होते. त्यांना बेनझीरची मुलाखत हवी होती. भारतीय पत्रकार दिलीप मुखर्जी यांनाच बेनझिरला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.
बेनझीर यांनी हे लिहिले आहे पुस्तकात
पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्यावर बेनझीर यांनी 'डॉटर ऑफ द ईस्ट' या पुस्तकात लिहिले, की सिमल्याला जाण्यासाठी मी वडीलांसोबत विमानातून प्रवास करीत होती. यावेळी त्यांनी सांगितले, की कुणासमोर जास्त हसायचे नाही. पण तू नाराजही दिसायला नको. त्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यावर बेनझिर म्हणाल्या, मग मी कशी दिसू. तर ते म्हणाले, ना आनंदी ना दुःखी...
पुढील स्लाईडवर बघा, बेनझीर भुट्टो यांच्या सिमल्या दौऱ्याचे काही फोटो....