आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री म्हणाले अम्मा बदलल्या होत्या.. 2 वर्षांपूर्वी तुरुंगात गेल्यापासून खालावली होती तब्येत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर 2014 मध्ये तुरुंगात रवानगी झाल्यानंतरपासून जयललिता यांची प्रकृती सतत खालावत गेली होती. त्यानंतर बहुधा त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूरच राहत होत्या. अनेक दिवस त्यांना प्रकृती खालावत असल्याचे कोणाच्या लक्षातही येऊ दिले नव्हते.

एका माजी मंत्र्यांच्या मते, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बदलल्या होत्या अम्मा. त्यानंतर त्यांना कशाचाही आनंद होत नव्हता. अपोलोमध्ये दाखल होण्याच्या दोन दिवस आधी 20 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात उपस्थित होत्या पण तेही व्हील चेअरवर.
एकटेपणा बनला जीवनाचा भाग..
- इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार जयललितांची तब्येत हा कधीही चिंतेचा मुद्दा ठरला नाही, तसेच याचा मुद्दाही कधीच तयार करण्यात आला नव्हता.
- पण सप्टेंबर 2014 मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सुमारे 8 महिन्यांसाठी त्यांची कर्नाटक तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
- अम्मांची तुरुंगात रवानगी झाली तेव्हापासून सर्वकाही बदलले होते.
- जयललितांनी कधीही कोणालाच त्यांच्या खासगी जीवनात डोकावण्याची परवानगी दिली नाही.
- खासगी जीवनाबाबत कोणालाही काहीही माहिती होत नसल्याने त्या किती आजारी आहेत हे कोणालाही कळत नव्हते.
- नुकत्यात निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून जयललितांनी स्वतःला महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवले होते.
- त्यांचे विश्वासू समर्थकच सरकार चालवत होते. त्यात त्यांच्या मुख्य सचिव बालाकृष्णन यांचाही समावेश होता.
पुढील स्लाइड्सवर वाचा, दोन वर्षांमध्ये कसे बदलले होते अम्मांचे जीवन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...