आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडमध्ये सापडले 2 हजार वर्षांपूर्वीचे शिवलिंग; काशी विश्वनाथाप्रमाणेच आहे हे शिवलिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(साईट क्रमांक 15 च्या खोदकामादरम्यान मिळालेल्या मंदिरांचे अवशेष, यामध्ये 4 फुट लांबी, 2.5. फुट परिघाचे हे शिवलिंग मिळाले. )
महासमुंद - सिरपूर येथे करण्यता आलेल्या उत्खननात 4 फुट लांबी असलेले आणि 2.5 फुट परिघाचे पाषाणापासून बनलेले एक शिवलिंग मिळाले आहे. छत्तीसगड पुरातत्व सल्लागार अरूण कुमार शर्मा यांनी हे शिवलिंग दोन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा केला आहे. तसेच हे राज्यातील सर्वात जुने आणि मोठे शिवलिंग असल्याचेही त्यांनी सांगितले. हे शिवलिंग काशी विश्वनाथ आणि उज्जैनच्या महाकालेश्वरच्या शिवलिंगाप्रमाणेच दिसते. या शिवलिंगाचा दगड अत्यंत सफाईदार आहे. पहिल्या शतकातील सरभपुरीया येथील राजांनी हे शिवलिंग बनवल्याचे पुरावे मिळाले आहेत. तर या शिवलिंगामध्ये विष्णूसुत्र (जनेऊ) आणि असंख्य शिव रेखा आहेत.
साइट क्रमांक 15 मध्ये मिळाले शिवलिंग
सिरपुर येथील साईट क्रमांक 15 मध्ये उत्खननादरम्यान मिळालेले हे शिवलिंग बाराव्या शतकात आलेल्या भूकंपानंतर चित्रोत्पला महानदीला आलेल्या महापूरात हे मंदिर संपूर्णपणे नष्ट झाले होते. मंदिराचे खांब नदीच्या किनार्‍याला गेले होते. सिरपूरमध्ये अनेक वर्षांपासून चालू असलेल्या या खोदकामात शेकडो शिवलिंग मिळाले आहेत. यामध्ये गंधेश्वर सारखे दिसणारे शिवलिंगही मिळाले आहे.
भूकंप आणि पूरामुळे गंधेश्वराचे मंदिर पूर्णपणे अस्ताव्यस्त झाले होते. मात्र येथे पांढर्‍या दगडात बनलेले शिवलिंग अजून जसेच्या तसे आहे. सिरपूरमध्ये मिळालेल्या या गंधेश्वराच्या शिवलिंगातून तुळशीच्या झाडाप्रमाणे सुवास येत आहे.
सर्वात प्राचिन मंदिर मिळणे बाकी
पुरातत्व सल्लागार अरूण कुमार शर्मा म्हणाले की, ब्रिटीश पुरातत्व शास्त्रज्ञ बॅडलर यांनी 1892 मध्ये लिहिलेल्या एका पुस्तकात एका विशाल शिवमंदिराचा उल्लेख केला आहे. लक्ष्मण मंदिराच्या दक्षिणेमध्ये एका डोंगराखाली राज्यातील सर्वात मोठे आणि अत्यंत प्राचीन असे शिवलिंग आहे. जे अजून आम्हाला सापडले नाही.

असा मोजण्यात आला काळ
पुरातत्व जाणकारांच्या मते, भूकंप आणि पूरामुळे सिरपूर शहरात 12 व्या शतकात मोठा फटका बसला होता. कालांतराने नदीच्या वाळू आणि मातीमुळे हे शहर भूमिगत झाले. यावर साचलेल्या मातीला अनेक फुट खोदून या शहराच्या अवशेषांना बाहेर काढण्यात आले आहे. या उत्खननात नाणी, मुर्त्या, ताम्रपत्र, भांडी, शिलालेख यांच्या आधारावर या ठिकाणाचा काळ ठरवण्यात आला आहे. या ठिकाणी झालेल्या उत्खननाची खोली जसजशी वाढत आहे, तसतसे त्या काळाचे अनेक पुरावे मिळत आहेत. जमीनीच्या खोलवर हे शिवलिंग मिळाले. त्याआधारे हे शिवलिंग दोन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात आले.
भारतातील सर्वात उंच चार शिवलिंग

- 108 फुट उंचीचे कोटीलिंगेश्वर (कर्नाटक)

- 108 फुटाचे महाशिवलिंग (सिकंदराबाद, आंध्रप्रदेश)

- 65 फुटाचे झारखंड येथील हरिहर धाम मंदिर

- 22 फुटाचे मध्यप्रदेशच्या भोजपूर येथील मंदिर


पुढील स्लाईडमध्ये पाहा, इतर फोटो...