आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Female Athletes Attempt Suicide Over Alleged Harassment In Kerala, 1 Dead

शारीरिक छळाच्या शिकार चार अल्पवयीन अॅथेलिट मुलींनी घेतले विष, एकीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्महत्या करणाऱ्या अॅथेलिटचा मृतदेह - Divya Marathi
आत्महत्या करणाऱ्या अॅथेलिटचा मृतदेह
अलापुझा (केरळ) - स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एसआयई) च्या वतीने आयोजित वॉटर स्पोर्ट्स ट्रेनिंगसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलींपैकी 15 वर्षांची अपर्णा रामचंद्रन हिचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. इतर तिघींची प्रकृती गंभीर आहे. या चारही मुलींनी बुधवारी दुपारी साई वुमन्स होस्टलमध्ये विषारी फळ (ओथालांगा) खालल्यामुळे त्यांना विषबाधा झाल्याचे सांगितले जाते आहे. त्यांना बुधवारी रात्री सात वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पीडित मुलींच्या पालकांचा आरोप आहे, की सीनिअर्स मुलींना त्रास देत होते. काही सीनिअर्सनी मुलींना मानसिक त्रास देण्यासोबतच त्यांचे शारीरिक शोषण देखील केले होते.
कुटुंबीयांची आंदोलनाची धमकी
विषारी फळ खाऊन मृत्यूमुखी पडलेल्या अपर्णाच्या कुटुंबीयांनी वॉर्डन आणि सीनिअर्सने केलेल्या छळामुळेच चारही मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. गेल्या आठवड्यात कोचने अपर्णाला शारीरिक यातना दिल्या होत्या. त्यात तिच्या शरीरावर त्याचे व्रण देखील होते. पीडित मुलींच्या कुटुंबीयांची मागणी आहे, की लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करावा अन्यथा रास्तारोको आंदोलन केले जाईल. त्यानंतर गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी पोलिस महासंचालकांना तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
होस्टेल वॉर्डनने आरोप फेटाळले
होस्टेलच्या वॉर्डन रागिन यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्या म्हणाल्या, मुली बेशुद्ध पडल्यानंतर मला या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांना कोणीही त्रास दिला नाही, किंवा छळ केला नाही. असे झाले असते तर मला नक्कीच कळाले असते.
केंद्रीय क्रीडा मंत्रालय सतर्क
गुरुवारी संसदेत या मुद्दयावर आवाज उठल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालय सतर्क झाले. मंत्रालयाने साईचे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांना अलापुझा येथे जाऊन चौकशी करण्यास सांगितले आहे. क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, 'हॉस्पिटलमधील तिन्ही मुलींवर चांगले उपचार केले जातील याची दक्षता घेतली जात आहे. स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाशी संबंधीत जे कोणी या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्रे ...