आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारजाह येथून सोन्याची चार बिस्किटे बुटात लपवून आणली, मोहाली विमानतळावर अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - येथील आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल विमानतळावर एका व्यक्तीला सीमा शुल्क विभागाने सोन्याच्या चार बिस्किटांसह अटक केली. आरोपीची ओळख हर्ष (रा. जालंधर, पंजाब) अशी आहे. तो १४ ऑक्टोबर रोजी विमानाने मोहाली आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता, तेथे त्याला कस्टम विभागाने पकडले. बुटामध्ये त्याने सोन्याची बिस्किटे लपवली होती. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी संशयावरून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सोन्याची बिस्किटे आढळून आली. या बिस्किटांची किंमत ३९.१५ हजार इतकी आहे. सीमा शुल्क विभागाने विमानतळ पोलिस ठाण्यात हर्षविरोधात फिर्याद दिली आहे. 

२४ कॅरेटची बिस्किटे 
आरोपी हर्ष याच्याकडून जप्त करण्यात आलेली सोन्याची बिस्किटे २४ कॅरेटची असल्याचे सीमा शुल्क विभागाने सांगितले, आरोपी विमानातून बाहेर आला आणि मेटल डिटेक्टरजवळून गेला तेव्हा त्याच्यावर संशय आला. त्याची एका खोलीत नेऊन चौकशी केली तेव्हा काही सापडले नाही. बूट उतरवण्यास सांगितले तेव्हा त्याच्यात सोन्याची ४ बिस्किटे सापडली.
बातम्या आणखी आहेत...