आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्फाळमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट, चार जण जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळ - पाटण्यातील बॉम्बस्फोटांची दहशत कमी होत नाही तर इम्फाळमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. शहरातील भिरदोन शाळेजवळ आज (मंगळवार) सकाळी झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात चार जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिरदोन शाळेजवळ मार्केट कॉम्पलॅक्सजवळ बॉम्ब लावण्यात आला होता. आज सकाळी सहा वाजता त्याचा रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने स्फोट घडविण्यात आला. यामध्ये चार जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.