आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: चेन्नई: अपार्टमेंटमध्ये भीषण आग; 2 मुलांसह चौघांचा गुदमरुन मृत्यू; 5 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- वेदापलानी भागात एका अपार्टमेंटला आज (सोमवारी) पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दोन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमध्ये ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पार्किंगमधील 14 गाड्या जळून खाक...
- पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साऊथ पेरुमल स्ट्रीटवरील अपार्टमेंटमध्ये पहाटे पावणे पाज वाजता आग लागली.
- ग्राउंड फ्लोअरवरील इलेक्ट्रिक बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाला. नंतर आग संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरली.
- ग्राउंड फ्लोअरवरील पार्किंगमधील 14 गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

गुदमरुन चौघांचा मृत्यू...
- पाहाता पाहाता धुराचे लोट संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरले. चौघांचा धुरात गुदमरुन मृत्यू झाला. त्यात दोन मुलांचा समावेश आहे.
- मीनाक्षी (60), सेल्वी (30), शालिनी (10) आणि संजय (4) अशी मृतांची नावे आहेत.
-  जखमींना किलपोक मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, अागीची भीषणता दर्शवणारे फोटोज आणि VIDEO...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...