आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत न्यायला आला ऑटोवाला, गेट उघडले नाही तर त्याने घरात बघितले, बसला धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली (उत्तर प्रदेश)- दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सकाळी मुलांना शाळेत नेण्यासाठी ऑटोवाला आला. बराच वेळा गेट न उघडल्याने त्याने शेजाऱ्यांचा मदतीने एक खिडकी उघडली. आत बघितले तर जबर धक्काच बसला. कुटुंबातील चारही जणांची हत्या करण्यात आली होती.
अशी मिळाली माहिती
- मृतक व्यक्तीचे नाव नरेश सेठी आहे. तो प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करायचा.
- त्याच्या पत्नीचे नाव शिखा आहे. ती ब्युटी पार्लर चालवते.
- त्यांना 15 वर्षांचा शुभ आणि 14 वर्षांची आस्था अशी दोन मुले होती.
- रात्रीच्या सुमारास खिडकीचे गज कापून हल्लेखोर घरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तिघांचे गळे चिरले.
- काल सकाळी शुभचा पेपर होता. त्याला नेण्यासाठी ऑटोवाला आला होता.
- त्याने बराच वेळ हॉर्न वाजवला. तरी कुणीही घराबाहेर आले नाही. गेटही बंद होते.
- त्याला शंका आली. त्याने ही बाब शेजाऱ्यांना सांगितली.
- त्यानंतर सर्वांनी मिळून एक खिडकी उघडली. आत बघितले तर धक्काच बसला.
- चौघांचे मृतदेह खोलीत पडले होते. त्यांचे गळे चिरण्यात आले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा काय म्हणाले पोलिस.... कोणावर आहे संशय... काय आहेत शंका... चौथ्या स्लाईडपासून बघा घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...