आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Militants Killed In Encounter, Two More Bodies

आसाममध्ये गोळीबारात 4 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागाव/गुवाहाटी - बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्ट्समध्ये(बीटीएडी) बंद काळात एनडीएफबीच्या (एस) हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करणार्‍या जमावावर पोलिसांनी नागावात केलेल्या गोळीबारात सोमवारी चार जखमी झाले. 12 तासांच्या बंदमध्ये हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, हिंसाचारग्रस्त जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.
मुस्लिम विद्यार्थी संघटनेने दोबोका भागात पुकारलेल्या बंदमध्ये अनेक ठिकाणची वाहतूक अडवण्यात आली होती. पोलिसांनी रास्ता रोको मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. अन्य एका घटनेत सोनारीबीलमध्ये बंद समर्थकांनी वाहनांवर हल्ला चढवला. अल्पसंख्याकबहुल क्षेत्रात बंदला तुरळक प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात तणाव आहे. चर्चेला विरोध करणार्‍या एनडीएफबीने (एस) अल्पसंख्याक समुदायाचे 34 बळी गेल्याच्या निषेधार्थ बक्सा आणि कोक्राझारमध्ये बंद पुकारला होता. शुक्रवारपासून लागू केलेली संचारबंदी अंशत: शिथिल करण्यात आली आहे. बक्सामध्ये सहा तासांसाठी तर कोक्राझारमध्ये सात तासांसाठी प्रतिबंधात्मक आदेश स्थगित करण्यात आला. आसाममधील संघर्षात बीटीएडीमधील हजारो लोक स्थलांतरित झाले आहेत.