श्रीनगर - काश्मिर खोर्यातील तंगधार भागात शनिवारी सकाळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोएबाच्या चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. तर, लष्कराचे म्हणणे आहे, की सीमेपलिकडून शस्त्रसज्ज 200 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. ही माहिती 15 कोरचे जनरल कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा यांनी दिली आहे.
ताज्या माहितीनुसार, एलओसीजवळील तंगधार भागात दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसर सर्चिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले, तेव्हा दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरात भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले. चारही दहशतवादी दहशतवादी संघटना लष्करशी संबंधीत होते. त्यांच्याजवळून शस्त्र आणि दारूगोळा मोठ्याप्रमाणात जप्त करण्यात आला आहे.