आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरमध्ये काँग्रेसचे आणखी चार आमदार भाजपमध्ये दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंफाळ -मणिपूरमध्ये काँग्रेसला पुन्हा एक हादरा बसला.  त्यांच्या ४ आमदारांनी पक्षत्याग करून शुक्रवारी सत्तारूढ भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि प्रदेशाध्यक्ष भावनंद यांनी आमदार वाय. सुरचंद्र, एस. वीरा, ओ. लुखोई आणि गामथांग हाआेकिप यांचे पक्षात प्रवेश केल्याबद्दल स्वागत केले. तत्पूर्वी काँग्रेसचे श्यामकुमार आणि गिनसुआनहाऊ हे दोघे भाजपमध्ये दाखल झाले होते. निवडणुकीत काँग्रेसने २८ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला २१ जागांवर विजय मिळाला होता.
 
बातम्या आणखी आहेत...