आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येदियुरप्पांविरुद्ध चार एफआयआर दाखल; जमिनीची अधिसूचना रद्द करण्याचे प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी रविवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे उपाध्यक्ष बी. एस. येदियुरप्पा आणि अन्य व्यक्तींविरोधात आणखी चार एफआयआर दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्रिपदावर असताना सरकारी जमिनीची अधिसूचना रद्द करण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. या खटल्यामुळे येदियुरप्पा यांच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल झाले आहेत.
लोकायुक्तांचे अधिकारी म्हणाले, मुख्यमंत्री असताना येदियुरप्पा यांनी बंगळुरूच्या बनाशंकरी लेआऊटमधील सरकारी जमिनीची अधिसूचना रद्द केली होती. अशाच अवैध पद्धतीने आरएमव्ही, महालक्ष्मी बनासवाडी आणि एचबीआर लेआऊटमधील जमिनीची अधिसूचना रद्द केली होती. या प्रकरणांतील अन्य आरोपींत माजी खासदार जी. एस. बस्वराज, माजी आमदार नंदीश रेड्डी आणि काही सरकारी अधिकार्‍यांचा समावेश आहे.
सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमठ यांनी २०१४ मध्ये तक्रार दिली होती. यानंतर प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले होते. त्यावर ही कारवाई करण्यात आली. डी-नोटिफिकेशन आदेश २००९ ते २०१२ दरम्यान जारी करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...