आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लपून केले होते कोर्ट मॅरेज, घरी कळाले त्या रात्री घडले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोमल शर्मा आपला भाऊ निखिल सोबत - Divya Marathi
कोमल शर्मा आपला भाऊ निखिल सोबत
उदयपूर (राजस्थान)- लहानपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सज्ञान होताच दोघांनीही कोर्टात जाऊन लग्न केले. या बद्दल मुलीच्या घरच्यांना कळाले तेव्हा मुलीगी घर सोडून आपल्या पतीकडे रहायला गेली. ही गोष्ट सहन न झाल्याने मुलीच्या संपूर्ण कुटुंबाने जिव दिला. शेजारी राहाणाऱ्या लोकांनी सांगितले की, मुलीने दुसऱ्या जातीच्या तरूणाशी लग्न केले. त्यामुळे बदनामीच्या भितीने कुटुंबाने हे पाऊल उचलले...

सुत्रांनुसार, शिक्षक असलेले विनोद शर्मा यांचा लोक अतिशय आदर करत होते. ते राहत होते त्या गल्लीला लोक मास्तरसाहेबांची गल्ली म्हणून ओळखत होते. मोठी मुलगी कोमल असे काही करेल, अशी कल्पनाही घरच्यांनी केली नव्हती. असे सांगण्यात येत आहे की, करवा चौथच्या रात्री कोमलनेही उपवास केला होता. घरी जमलेल्या  महिलांनी कोमलला लपून चंद्राचे दर्शन करताना पाहिले होते. त्यांनी हे तिच्या आईला सांगितले होते. त्यानंतर सर्व महिला आपापल्या घरी निघून गेल्या होत्या.
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलने ठेवलेल्या करवा चौथच्या उपवासावरून घरात नक्की चर्चा झाली असावी. यानंतर कोमल निघून गेली आणि बदनामीच्या भीतीने विनोद शर्मा यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. कोमल कधी आणि कोणासोबत गेली याबद्दल कोणालाच माहित नाही.

दहाव्या वर्गापासून सोबत शिकत होते...
विनोद शर्माच्या शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार कोमल दाहावीत शिकत होती, तेव्हापासून दुसऱ्या जातीतील तरूणासोबत येत-जात असल्याचे त्यानी पाहिले होते. याबाबत विनोद शर्मा यांना कळल्यानंतर त्यानी तिला खोडले देखील होते. कोमल आणि त्या तरूणाने सोबतच ग्रॅज्यूएशन आणि बीएड केले होते. सात-आठ महिन्यापूर्वी कोमलने त्या तरुणाशी कोर्ट मॅरेज केले होते. परंतु, याबद्दल घरी कोणालाच सांगितले नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण...
- गेल्या रविवारी उदयपूर येथील ज्योतीनगर कॉलनीत राहणाऱ्या शिक्षक विनोद शर्मासह पत्नी कल्पना, मुलगी अंजु आणि मुलगा निखिल अशा संपूर्ण कुटुंबाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मा यांची मोठी मुलगी कोमल दुसऱ्या जातितील मुलाशी कोर्ट मॅरेज करून घरातून निघून गेली होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने हे पाऊल उचलले असावे. या घटनेपासून कोमल गायब आहे. संपुर्ण कुटुंबाच्या मृत्यूची बातमी ऐकूनही ती घरी परतली नाही. ती याच शहरात राहत असल्याचे सागण्यात येत आहे.

- विनोद शर्मा यांचे सर्व शेजारी त्यांच्याच घरी करवाचौथची कहाणी ऐकण्यासाठी येत होते आणि संपूर्ण गल्लीतील महिला तिथेच चंद्राची पूजा करत होत्या.
- आठ ऑक्टोबरलाही शेजारील महिला विनोद यांच्या घरी आल्या होत्या. तेव्हा तिथे कोमल लपून चंद्राची पूजा करताना दिसली.
- जेव्हा कोमलच्या घरच्यांना याबद्दल कळाले तर त्यांना धक्का बसला.
- करवाचौथच्या दुसऱ्याच दिवशी विनोद शर्मा, पत्नी कल्पना, मुलगा निखिल आणि मुलगी अंजू यांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली.
- या घटनेपासून कोमल आणि तो मुलागा आपल्या घरातून गायब आहे. कोमल आणि त्या मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसात कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...