आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Policemen Killed In Chhattisgarh After Naxals Blow Up Anti Landmine Vehicle

छत्तीसगड : 55 तासांच्या आत चौथा नक्षली हल्ला, ब्लास्टमध्ये 4 जवान शहीद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपुर - गेल्या 55 तासांत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी चौथा मोठा हल्ला केला आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील किरंदुलजवळ चोलणारमध्ये नक्षलवाद्यांनी आज अँटी लँडमाइन गाडीला ब्लास्ट करून उडवले. या हल्ल्यामध्ये एक जवान घटनास्थळीच शहीद झाला असून 11 जखमी जवानांपैकी 3 जवानांचा उपचार करताना मृत्यू झाला.
सर्व जखमी जवानांना एनएमडीसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानांची प्रकृती गंभीर असून ते काहीही सांगण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. पुढील उपचारासाठी त्यांना रायपूर येथे नेण्याची तयारी सुरु आहे. या ब्लास्टमध्ये 50 किलो आरडीएक्स वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अँटी लँडमाइन गाडीमध्ये 12 जवान होते. हे सर्व जवान सर्च ऑपरेशन करून परत येत होते. जवान चोलणार कँपजवळ येताच 60 ते 70 नक्षलवादी आले. त्यांनी मोठा ब्लास्ट केला. ब्लास्ट केल्यानंतर जवानांवर बेछूट गोळीबार करून दारुगोळा लुटण्याचाही प्रयत्न केला. या घटनास्थळाजवळच कँप असल्यामुळे बॅकअप टीम लगेच घटनास्थळावर दाखल झाली. त्यानंतर बराच वेळ फायरिंग झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला.
दंतेवाडाचे एसपी कमल लोचन कश्यप यांनी या घटनेला दुजोरा दिला असून तीन संशयिताना ताब्यात घेतल्याचे सांगितले.
पुढील स्लाईड्सवर पाहा संबंधित PHOTOS....