आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू काश्मिरात सीमा ओलांडून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ४ दहशतवाद्यांना लष्कराने आज सोमवारी कंठस्नान घातले. हे घुसखोर भारताच्या सीमेत उत्तर काश्मिरातील कुपवार जिल्ह्यातील केरन सेक्टरजवळील भागातून भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात होते.

संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या एका समूहाने नियंत्रण रेषेवरून घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर उडालेल्या चकमकीत प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले. यानंतरही भारतीय लष्कराने शोधमोहीम सुरूच ठेवली आहे.
बातम्या आणखी आहेत...