कोझिकोड- केरळमधील नदापुरम नावातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एका चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या सीनियर स्टूडेंट्सनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी आवाज उठवल्यानंतर स्कूल प्रशासनाने त्यांना रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवल्याने खळबळ उडाली आहे.
दारुल हुदा स्कूलमध्ये 30 ऑक्टोबरला ही घटना घडली. मात्र, 9 नोव्हेंबरला पीडित चिमुरडीच्या पोटात वेदना सुरु झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेला वेदना सुरु झाल्यानंतर तिला डॉक्टरांना दाखवले. पीडितेची तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झालेचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय चौकशीत पीडित चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. सीनियरने तिला बाथरूममध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याने पीडितेने स्वत: डॉक्टरांना सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी काही सीनियर स्टूडेंट्सला ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे, पीडित विद्यार्थिनीचे नातेवाईक राजकीय पक्षांनी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी शाळेसमोर आंदोलन केले होते.
दुसरीकडे, दिल्लीतील जेएनयूच्या पीएचडीच्या अंतिम वर्षाच्या एका विद्यार्थिनीने एका रिसर्च स्टूडेंटवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. दोन वर्षांपासून विवाहाचे अमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, जेएनयूमध्ये पीएचडीच्या स्टूडेंटवर लैंगिक शोषणाचे प्रकरण आले समोर...