आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार युवकांची ‘सुसाइड’ स्टोरी यूट्यूबवर चर्चेत, 1.20 लाख हिट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा - आदिल, जुनैद, रोमिश आणि शोएब या वीस ते पंचविशीतील हे तरुण सध्या यूट्यूबवर अनेक दिवसांपासून झळकत आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे बदनाम कोटा शहर ही या चौघांची पार्श्वभूमी आहे. कधी काळी स्वत: आत्महत्या करण्याचा विचार करणाऱ्या चौघांनी ‘ट्रू लव्ह : अ बॉय हू वाँट्स टू डाय फॉर गर्ल्स’ या लघुपटाची निर्मिती केली. तरुणांना प्रेरणा देणाऱ्या या लघुपटाला आठ महिन्यांत १.२० लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत. सरासरी ५०० जण दररोज यूट्यूबवर पाहत आहेत. चित्रपट तरुणांना आत्महत्या न करण्यासाठी प्रेरणा देतो.

विशेष म्हणजे चौघांनी मोबाइलवर चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. त्यांनी चित्रपटातील संगीत, चाली लावणे तसेच संपादनापर्यंतचे सर्व कौशल्य यूट्यूबमधूनच शिकले. यापूर्वी त्यांना चित्रपट निर्मिती प्रक्रियेची काहीही माहिती नव्हती. लघुपटाचे दिग्दर्शन आदिल रिझवी याने केले आहे. आदिल म्हणाला, मला स्वत:ला प्रेमप्रकरणात विश्वासघात झाला होता. यानंतर आत्महत्या करण्याचा विचार आला. मात्र, ऐनवेळी आईची अाणि ऑटोचालक वडिलांची आठवण आल्याने निर्णय बदलला. चित्रपटाचे कथानकही काहीसे असेच आहे.

एक महाविद्यालयीन तरुण त्याच्याच वर्गातील मुलीवर प्रेम करत असतो. मुलगीही त्याच्यावर प्रेम करू लागते. एके दिवशी मुलीला हवा असलेला ड्रेस मुलगा देऊ शकत नाही. त्यामुळे मुलीने त्याची साथ सोडत दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध जुळवले. चित्रपटातील नायकाला हे सहन न झाल्याने तो आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडतो. मात्र, त्या क्षणी आई आणि वडिलांची आठवण झाल्याने तो माघारी फिरतो. जगात आईपेक्षा अन्य कोणीही जास्त प्रेम देऊ शकत नाही, हा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे. आदिलचे मित्र अमान, अंकिता, रेहान व फरहानने यामध्ये व्यक्तिरेखा निभावल्या आहेत. प्रेरणा देण्यासाठी या माध्यमाचा का आधार घेतला, या प्रश्नावर आदिल म्हणाला, मला व्हिडिओ व छायाचित्रणाची आवड आहे. त्यामुळे प्रेमभंगानंतरच्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तीन वर्षे यूट्यूबमधून चित्रपट निर्मितीतील बारकावे शिकले. यादरम्यान त्याला जुनैद, रोमिश आणि शोएब यांची मदत मिळाली. तरुणांना समजावण्याची हीच पद्धत आहे. ए-रिज म्युझिक अँड फिल्म्सच्या बॅनरखाली तरुणांच्या आत्महत्या रोखणे हा त्यांचा पुढील उद्देश आहे.
बातम्या आणखी आहेत...