आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • France First Air Strikes On Islamic State In Iraq

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी ISIS च्या तळांवर सुरू केले हवाई बॉम्ब हल्ले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस/बगदाद - फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी इराकच्या इस्लामिक स्टेट्सच्या विरोधात कारवाई करत त्यांच्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सुआ ओलांद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

राष्ट्रपती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात इराकच्या उत्तर-पूर्व भागातील काही तळांवर आणि शस्त्रांच्या डेपोवर हवाई हल्ले करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ISIS च्या ठिकाणांबाबत माहिती घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून फ्रान्सची टोही विमाने इराकच्या वायुसीमेत गस्त घालत होती. त्याशिवाय फ्रान्स, कुर्द जवानांना शस्त्रेही पुरवत आहे.

फ्रान्सची विमाने केवळ इराकच्या ISIS च्या दहशतवद्यांची तळे असणा-या ठिकाणांवरच हल्ला करणार असल्याचे राष्ट्रपती ओलांद यांनी स्पष्ट केले आहे. शेजारीच असलेल्या सिरियामधील दहशतवादी ठिकाणांवरही कारवाई केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच इराकमध्ये सैन्य पाठवणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्टपणे मांडली.

राष्ट्रपती कार्यालयाच्या माहितीनुसार, दहशतवादी ठिकाणांवर राफेल विमानांद्वारे हल्ले करण्यात आले असून, त्यामध्ये ही ठिकाणे पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. तसेच आगामी काही दिवस हे हल्ले सुरुच राहणार आहेत.
विशेष म्हणजे दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेच्या विमानांद्वारे इराकवर आधीच हल्ला सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या विमानांनी इस्लामिक स्टेट्टमधील विविध ठिकाणांवर 170 पेक्षा अधिक हल्ले केले.