आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • France President Hollande On The 3 Days Tour In India

चंदिगड- भारत-फ्रान्स बिझनेस समिटमध्ये मोदी-ओलांदही सहभागी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडिया-फ्रांस बिझनेस मीटमध्ये मोदी आणि ओलांद. - Divya Marathi
इंडिया-फ्रांस बिझनेस मीटमध्ये मोदी आणि ओलांद.
चंदिगड/नवी दिल्ली- तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर चंदिगड येथे रविवारी सायंकाळी भारत-फ्रान्स बिझनेस समिटमध्ये भाग घेतला. या आधी नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ओलांद यांचे स्वागत केले आणि त्यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. या नंतर दोघे रॉक गार्डनमध्ये भेटले. ओलांद यांच्या दौऱ्यात डिफेंस, सोलर एनर्जी आणि स्‍मार्ट सिटी या विषयांवर करार होण्याची शक्यता आहे.
बिजनेस समिटमध्ये काय म्हणाले मोदी
- या वेळी मोदी म्हणाले की, 'भारत आर्थिक दृष्ट्या जगातील झपाट्याने विकसित होत असलेला देश आहे. आमच्याकडे आपल्यासाठी मनुष्यबळ आणि बाजारपेठ या दोनही गोष्टी आहेत.
- 400 फ्रेंच कंपन्यांना भारतात कामकरण्याचा चांगला अनुभव आहे.
- आमच्याकडे 80 कोटी युवा आहेत. गुड गव्हर्नेंसच्या माध्यमातून ग्लोबल बेंचमार्क मिळवण्याची आमची इच्छा आहे.
ओलांद यांचा दौरा चंदिगड मधूनच का...?
- 50 वर्षांपूर्वी स्विस-फ्रान्सीसी आर्किटेक्ट ली कार्बूजिएने चंदिगड शहराचे डिझाइन केले होते.
- चंदिगड शहराला यूनेस्कोमध्ये हेरिटेज सिटीचा दर्जा देण्याचाही प्रयंत्न सुरू आहे.
- भारताची इच्छा आहे की, फ्रान्सने चंदिगड शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी मदत करावी.
प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे
फ्रान्सवा ओलांद यांचा भारत दौरा द्विपक्षीय संबंधाला बळकटी देणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फ्रेंच लष्कर तसेच बँड देखील राजपथावरील पथसंचलनाचे आकर्षण ठरेल. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी भारतात येणारे ते पाचवे फ्रेंच नेते ठरले आहेत. यापूर्वी १९७६, १९८०, १९९८, २००८ मध्ये फ्रेंच नेते पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, राफेलच्या डीलवर काय म्हणाले ओलांद?
- मोदींचे ट्वीट
-फोटोतून पाहा, ओलांद यांचा भारत दौरा...