आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहा विक्रेता असा बनला करोडपती, सफारीचा थाट अन् सोबत अॅपलचा लॅपटॉप!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुन्ना भंडारी आधी साधी चहाची टपरी चालवायचा. - Divya Marathi
मुन्ना भंडारी आधी साधी चहाची टपरी चालवायचा.
झांशी - वर्ल्ड फेमस ओरछा येथील राम राजा मंदिराचा क्लार्क मुन्ना भंडारीवर हेराफेरीचा आरोप आहे. त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुन्ना भंडारी याच्याबाबत सांगितले जाते की, तो पूर्वी रस्त्यावर चहा विकायचा, आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.
 
चहा विक्रेता कसा बनला करोडपती?
- मुन्नालाल तिवारी टिकमगढ जिल्ह्याच्या गोरा गावात राहणारे आहेत. 1990 मध्ये ते ओरछामध्ये आले, 7 वर्षांपर्यंत त्यांनी रामराजा मंदिराबाहेर चहाची दुकान चालवली.
- 1997 मध्ये एका क्लर्कच्या माध्यमातून ते मंदिराशी जोडले गेले. त्याच्याच मार्फत तो लोकांना वितरित करण्यात येत असलेल्या प्रसादाचा भंडारी बनला.
- काही वर्षांनी लक्ष्मण सिंह यांच्या मृत्यूनंतर त्याला मंदिराचा क्लर्क बनवण्यात आले. यासाठी त्याला महिना 10 हजार रुपये पगार मिळायचा. क्लर्क पदावर काम करणारा मुन्ना मग सफारी गाडीतून फिरायला लागला. अॅपलचा लॅपटॉपही सोबत बाळगायला लागला.
- ओरछामध्ये त्याची 3 घरे आहेत. ज्या घरात तो राहतो, ते अनेक एकरांवर बांधलेले आहे. 2 मुले आहेत, जी झांशीतील सर्वात महाग शाळेत शिकतात, येथील महिन्याकाठी फीस हजारोंमध्ये आहे.
 
दानपेटीसमोरचा CCTV मुद्दाम केला खराब...
- झांशीपासून 18 किमी अंतरावरील ओरछामध्ये श्री रामराजा मंदिर आहे. हे असे एकमेव मंदिर आहे, जेथे श्रीरामांना देवाऐवजी राजा म्हणून पूजले जाते. यामुळे येथे रोज श्रीरामांना राजाप्रमाणे सन्मानित केले जाते.
- मंदिरात मुन्ना लाल तिवारी ऊर्फ मुन्ना भंडारी 20 वर्षांपासून क्लार्क म्हणून काम करत आहे. त्याच्यावर मंदिराच्या दानपेटीतील रकमेची हेराफेरी केल्याचा आरोप आहे.
- सामाजिक कार्यकर्ते राघवेंद्र राय यांनी याची तक्रार दिली होती, यानंतर टिकमगड पोलिसांनी तपास सुरू केला. 
- पोलिसांना तपासादरम्यान मंदिरातील हेराफेरी आणि इतर आर्थिक प्रकरणांत घोटाळा झाल्याचे सिद्ध करणारे पुरावे मिळाले. आरोपी क्लार्कविरुद्ध केस दाखल करण्यात आली आहे. मंदिरावर कुठलीही नोंद केल्याशिवाय लाखो रुपये खर्च करण्यात आले. सोन्याचीही 24 आभूषणे गायब आहेत.
- मंदिरात एकूण 28 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत., दानपेटीसमोरील कॅमेरा खराब असल्याचे आढळले. असे मुद्दामहून करण्यात आले होते. गुप्तदान करणाऱ्यांचा कोणताही हिशेब नाही. यासोबतच सकाळ-संध्याकाळ देवाला लावण्यात येणारे भोग आणि भेट म्हणून येणाऱ्या वस्त्रांमध्येही मोठी गडबड आढळली.
- एवढेच नाही, खर्चासाठी बिल काढताना नायब तहसीलदारांचे बनावट हस्ताक्षरही करण्यात आलेले दिसले.
- स्थानिक लोकांनी नायब तहसीलदारावरही कारवाईची मागणी केली. नायब तहसीलदार मंदिराचे सहव्यवस्थापक आहेत. लोक म्हणाले, त्यांच्या सहभागाशिवाय ही हेराफेरी होऊच शकत नाही. दोघांची मिलीभगत असून त्याचा शोध घेतला जावा.
 
अनेक महिलांशी अवैध संबंध
- SDM आदित्य सिंह म्हणाले, क्लर्कचे अनेक महिलांशी अवैध संबंधही होते. तपासादरम्यान त्याचे महिलांसोबतचे प्रायव्हेट, आक्षेपार्ह फोटोही आढळले. लग्नाचे आमिष देऊन त्याने अनेक महिलांशी फसवले आहे.
- या प्रकरणात मुन्नाविरुद्ध FIR दाखल करण्यात येईल. स्थानिक लोकांच्या मते, क्लर्कला बारगर्ल्सच्या डान्सचाही नाद आहे, तो मद्याचा शौकीन आहे.
- ओरछाचे टीआय डीडी आझाद म्हणाले, एसडीएम आदित्य सिंह यांच्या तक्रारीवरून मंदिर क्लर्क मुन्ना तिवारीवर 420 सहित 9 कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...