आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेमधील मोफत औषधोपचार बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - रेल्वे प्रवास करताना एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर त्याला यापुढे मोफत उपचार मिळणार नाहीत. उपचार हवे असल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.


रेल्वेतील डॉक्टर जी औषधे देतील त्याचे छापील किमतीनुसार पैसे द्यावे लागणार आहेत. रेल्वे मंडळाने या संबंधी एक आदेश जारी केला आहे. डॉक्टरांची फीस 20 रुपये असेल. मलमपट्टीसाठी पाच रुपये भरावे लागतील. औषधे लागली तरी किमतीनुसार पैसे द्यावे लागतील. प्रवाशांच्या तिकिटात उपचाराचे शुल्क समाविष्ट नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता शुल्क भरावे लागणार आहे.