आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोफत झेरॉक्स कॉपी देऊनही त्यांची कमाई 50 हजार रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - दहावीत शिकणार्‍या पाच मुलांनी मोफत झेरॉक्स देऊनही कमाईचा मार्ग शोधला आहे. झेरॉक्स पानाच्या दुसर्‍या बाजूला जाहिरात छापून त्यांनी 50 हजार रुपये कमावले आहेत. अभ्यास प्रकल्प म्हणून सुचलेल्या या अफलातून कल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राहिष कालरिया, ध्रुविन दोशी, नील पुंजाणी, जिगर परसाणा, तन्मय वाच्छानी यांच्या झेरॉक्स सेंटरचे नाव ‘मोफत कॉपी : फ्री फोटोकॉपी फॉर एव्हरीवन’ आहे. मुलांनी झेरॉक्स सेंटरवर एक नोकरही ठेवला आहे.


हे झेरॉक्स सेंटर हीच आज या मुलांची ओळख बनले आहे. ही सर्व मुले नियमित शाळेत जातात. सेंटरवर त्यांनी एक व्यक्ती नोकरीला ठेवला आहे. त्याला ते रीतसर वेतनही देतात. झेरॉक्स मशीनसह सर्व बाबी किरायाच्याच आहेत. या सर्वांचा खर्च वजा जाता आतापर्यंत 50 हजार रुपये कमाई केली आहे.


शालेय प्रकल्पातील आयडिया प्रत्यक्षात
सव्र्हे करून सुरू केले सेंटर : झेरॉक्स सेंटरची सुरुवात 15 जुलै रोजी झाली. आजवर 2500 कॉपींची विक्री झाली आहे. सेंटर 10 ते 6 या वेळेत चालते. 15 ते 16 वष्रे वयोगटातील या मुलांनी सेंटर सुरू करण्याआधी झेरॉक्स दुकानांचे सर्वेक्षण केले. ग्राहकांची स्थिती व लागणार्‍या झेरॉक्सची माहिती घेतली. शिवाय झेरॉक्सचे काम शिकून घेतले. प्रचारासाठी पत्रके वाटली, टी-शर्ट तयार केले. झेरॉक्स मशीनसह सर्व काही भाड्याचेच आहे.


प्रारंभी दोघांचीच जाहिरात: जाहिरातीसाठी अनेक व्यापारी, कंपन्यांना फोन केले. प्रारंभी दहा जणांनी भेटण्याची परवानगी दिली. दोघांनीच जाहिरात देण्याची तयारी दाखवली. खर्चही निघत नव्हता. आता जाहिरातदारांची प्रतीक्षा यादी तयार होत आहे. आणखी सेंटर्स काढण्याचा मुलांचा विचार आहे.