आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फ्रीडम 251\' फोन विकणाऱ्या कंपनीचा एमडी ताब्यात’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझियाबाद-  फ्रीडम २५१ फोन विकणारी कंपनी “रिंगिंग बेल्स’चे व्यवस्थापकीय संचालक मोहित गोयल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ग्राहक व वितरकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी केली जात आहे. 
 
गाझियाबादची फर्म आयाम इंटरप्रायजेसने गोयल यांच्याविरुद्ध १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा एफआयआर दाखल केला होता. तक्रारीत म्हटले की, गाेयल व कंपनीच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आयाम इंटरप्रायजेसला फ्रीडम २५१ चे वितरक होण्यास तयार केले. फर्मने रिंगिंग बेल्सच्या नावाने ३० लाख रुपयांचे आरटीजीएस केले. कंपनीने १३ लाख रुपयांचे फोन दिले. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर एक लाख रुपये परत केले. 
 
उर्वरित १६ लाख रुपये मागितल्यावर फर्मच्या मालकास व कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. ३० हजार जणांनी फोनची बुकिंग केली होती आणि ७ कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी त्याची नोंदणी केली ,असा दावा फर्मने केला आहे.  फ्रीडम जगातील सर्वात स्वस्त फोन असल्याचे सांगत जाहिरात कंपनीने केली होती.
बातम्या आणखी आहेत...