आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाककडून पुन्‍हा गोळीबार, शस्‍त्रसंधी निरर्थकः सैन्‍य अधिका-यांची प्रतिक्रीया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मु - पाकिस्‍तानी सैनिकांनी जम्मु आणि काश्‍मीरमधील पूंछ जिल्ह्यात दोन वेळा गोळीबार केला. भारतीय सैन्‍याने त्‍यास जोरदार प्रत्‍युत्तर दिले. पाकिस्‍तानी सैन्‍याकडून अलिकडच्‍या काळात दररोज शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघ होत आहे. त्‍यामुळे शस्‍त्रसंधीचा करार निरर्थक असल्‍याची संतप्‍त प्रतिक्रीया सैन्‍याच्‍या एका अधिका-याने दिली आहे.

यासंदर्भात सैन्‍याचे प्रवक्ते कर्नल आर के पालता यांनी माहिती दिली. पूंछमधील हमीरपूर भागातील काही भारतीय चौक्‍यांवर पाकिस्तानी सैनिकांनी काल (बुधवार) रात्री 9.30 वाजता जोरदार गोळीबार केला. त्‍यानंतर रात्री 11 वाजताच्‍या सुमारास पाकिस्‍तानी सैन्‍याने मेंढर येथील चौक्‍यांवर गोळीबार केला. दोन्‍ही घटनांना भारतीय सैनिकांनी दमदार प्रत्युत्तर दिल्‍याची माहिती पालता यांनी दिली. दोन्‍ही चकमकी सुमारे तासभर चालल्याचेही पालता यांनी सांगितले. चकमकींदरम्‍यान कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्‍तानी सैनिकांनी स्‍वयंचलित बंदुका आणि मोर्टारचा वापर केला.