आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेच्या पाठीवर प्राचार्य, 14 वर्षांपासून दोन्ही मैत्रिणींचे आहे असे नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - सध्याचा काळ जबाबदारी झटकण्याचा असला तरी याच काळात २१ वर्षांची एक युवती तब्बल १४ वर्षांपासून आपल्या अपंग मैत्रिणीचा पाठीवर सांभाळ करत आहे. उर्वरित आयुष्यभर मैत्रिणीला सांभाळण्याचा तिचा निर्धार आहे.

ही कहाणी आहे झारखंडची रीना आणि तिची मैत्रीण मीना यांची. रांचीपासून २८ किमी अंतरावर पिठौरिया गाव. गुडगुडचुमा जंगलात उरुगुटू पंचायत असून तेथे डिव्हाइन ओंकार मिशन शाळा आहे. दोन्ही मैत्रिणी तेथेच शिकतात. मीना प्राचार्य आहे, पण जन्मत: अपंग. रीना ही शिक्षिका आहे. ती दररोज आपल्या मैत्रिणीला पाठीवर घेऊन शाळेत आणते. मीना आधी मुलांना शिकवते. रीनाचा क्रमांक नंतरचा. आणि ही काही एका दिवसाची गोष्ट नाही. दोघी सात-आठ वर्षांच्या होत्या तेव्हापासून हा सिलसिला सुरू आहे. तेव्हापासून रीनाही थकली नाही अन् मीनानेही हार मानली नाही. रामगढ कँटमध्ये डिव्हाइन ओंकार मिशन स्कूलची शाखा आहे. दोन्ही मैत्रिणींची पहिली भेट तिथेच झाली होती. त्या दिवशी मीना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी शाळेच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न वारंवार करत होती. पण ती चढू शकत नव्हती. जवळच असलेल्या रीनाला ते पाहवले नाही. तिने मीनाला पाठीवर घेतले आणि वर चढली. आणि हा सिलसिला सुरूच राहिला. आधी रामगढच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केले. नंतर रांचीच्या संजय गांधी मेमोरियल कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. या काळात अनेक अडचणी आल्या. मीनाचे दोन भाऊ आणि एकुलत्या एक बहिणीचा मृत्यू झाला. रीनाच्या वडिलांची हत्या झाली. आईने दुसरे लग्न केले. रीनाला तिच्या दोन धाकट्या बहिणींनी आर्थिक मदत केली. तीही इतरांच्या घरी धुणीभांडी करून. हा प्रवास असाच सुरू राहिला. आता सर्व जण या ‘आदर्श मैत्री’चा उल्लेख करतात.

पुढील स्लाइडमध्ये, मीना पाठीवर नसली तर चालण्याची मजाच येत नाही...
बातम्या आणखी आहेत...