आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णांची आजपासून ‘जनतंत्र यात्रा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रविवार, 31 मार्च रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथून देशव्यापी जनतंत्र यात्रेवर निघणार आहेत. त्यांच्यासमवेत माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह देखील असतील. रविवारी कपुरथला, जालंधरमध्ये सभा होतील. पाच दिवसांच्या राज्य दौ-यात ते आठ मतदारसंघांत सभा घेतील. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत अण्णा म्हणाले, जनलोकपाल विधेयकावरून केंद्र सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही. सरकार वारंवार फसवणूक करत आहे. पंतप्रधानांच्या सहमतीने प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, परंतु त्यालाही अमलात आणले गेले नाही. आता जनतेने एकजूट दाखवून सरकारला सत्तेवरून खेचण्याची वेळ आली आहे. एक महिन्यात जनतंत्र मोर्चासोबत 8 लाख लोक जोडले गेले आहेत, असे ते म्हणाले.