आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडक सुरक्षा व्‍यवस्‍थेत अमरनाथ यात्रेस सुरूवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्‍मू- बहुप्रतिक्षित अमरनाथ यात्रा गुरूवारी सुरू झाली आहे. पवित्र गुहेत दर्शनासाठी 3153 भाविकांचा पहिला जत्‍था रवाना झाला आहे. हा जत्‍था पवित्र गुहेचे दर्शन घेण्‍यासाठी भगवती नागरथ आधार शिबिराच्‍या यात्री निवासातून पहेलगाम आणि बालताल रस्‍त्‍याने निघाला आहे. सुमारे तीन लाख लोकांनी यात्रेसाठी नोंदणी केलेली आहे. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्‍ल्‍याचे सावट आहे.

राज्‍य परिवहन मंडळाने 73 बसेस आणि 21 छोटी वाहनांची यात्रेसाठी सोय केली आहे. यात्रेकरूंना घेऊन जाणारी पहिली बस सकाळी पाच वाजून 35 मिनिटांनी तर शेवटची बस सहा वाजून 16 मिनिटांनी रवाना झाली. केंद्रीय सुरक्षा संस्‍थांनी यात्रेवर दहशतवादी हल्‍ल्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जम्‍मू काश्‍मीरचे मुख्‍यमंत्री उमर अब्‍दुल्‍ला यांच्‍याशी चर्चा केली आहे.