आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fruits For Asaram In Jodhpur Jail, Divya Marathi

तुरुंगात डा‍ळिंब, पपई खाताहेत आसाराम बापू; छायाचित्रांतून पाहा भक्तांची \'आंधळी भक्ती\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून स्वयंघोषित आध्यात्मिक संत आसाराम बापू जोधपूर तुरुंगात आहेत. आसाराम यांना तुरुंगात 'व्हीआयपी सर्व्हिस' मिळत असल्याचे उघड झाले आहे. आयुर्वेद विद्यापीठातील वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार आसाराम यांच्यासाठी तुरूंग प्रशासनाने हंगामी फळे उपलब्ध करून दिली आहेत. यात सफरचंद, डाळिंब, पपई, आवळा यांचा समावेश आहे. त्यांना म्हशीचे दूधही दिले जात आहे. ही माहिती सरकारी वकील राजूलाल मीणा व पीडि़त विद्यार्थिंनीचे वकील प्रमोद कुमार वर्मा यांनी जिल्हा कोर्टात दिली.

आसाराम यांना जेवणात गव्हाची पोळी, भात आणि डाळ दिली जात आहे. एवढेच नाही तर आसाराम तुरूंगात चक्क हंगामी फळांचाही आस्वाद घेत आहे. याप्रकरणी आज (गुरुवारी) सुनावणी होणार आहे.

आसाराम यांचा खटला तुरुंगातच चालवण्यात येण्याची मागणी त्यांचे वकील जगमालसिंह चौधरी यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. आरोपींच्या सुनावणीचा खर्च उचलणे ही सरकारची जबाबदारी आहे. तुरुंगात सुनावणी योग्य नसल्याचेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी कॉल डिटेल व पीडि़त तरुणीची दिल्लीतील व्हीडिओ सीडी उपलब्ध करण्याबाबत दाखल करण्‍यात आलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे. सुनावणीला पाचही साक्षीदारांना उपस्थित राहण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

आसाराम यांच्या आणखी दोन सेवेकर्‍यांना जा‍मीन
आसाराम आश्रमातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणप्रकणातील आसाराम यांच्या दोन सहकार्‍यांची हायकोर्टाने जामिनावर सुटका केली आहे. प्रकाश व शरदचंद्र अशी या आरोपींची नावे आहेत. न्यायाधीश निर्मलजीत कौर यांच्या कोर्टाने हा निर्णय दिला. यापूर्वी आसाराम यांची सहकारी शिल्पी व शिवा यांना जामीन मिळाला होता तर आसाराम याचा जामीन अर्ज फेटाळला होता.

आसाराम यांच्या भक्तांची 'आंधळी भक्ती' पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...