आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सईद सुपूर्द-ए-खाक, मेहबुबा यांनी पित्याला दिला अखेरचा निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांना अखेरचा निरोप देताना मेहबुबा मुफ्ती यांचे डोळे भरुन आले होते. - Divya Marathi
वडिलांना अखेरचा निरोप देताना मेहबुबा मुफ्ती यांचे डोळे भरुन आले होते.
श्रीनगर - राज्याचे दिवंगत नेते मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पार्थीवावर गुरुवारी सायंकाळी त्यांच्या गावी बिजबेहरा येथे शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला.

मुलगा तसादुकने दिला खांदा
गुरुवारी दुपारी वायुदलाच्या विमानाने मुफ्ती यांचे पार्थीव नवी दिल्लीहून श्रीनगरला आणण्यात आले. मेहबुबा मुफ्ती यांचे बंधु तसादुक यांनी सर्वात पुढे राहून पित्याच्या पार्थीवाला खांदा दिला. तसादुक मुंबईत राहातात, ते सिनेमाटोग्राफर आहेत.

दोन वेळा झाली 'जनाजे की नमाज'
बिजबेहरा येथील पातशाही कब्रस्तानमध्ये हजारो लोक जमले होते. त्यांना सुपूर्द-ए-खाक करण्याआधी दोन वेळा 'जनाजे की नमाज'चे पठण करण्यात आले. प्रथम श्रीनगरमध्ये शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये आणि दुसऱ्यांवेळी त्यांच्या गावी बिजबेहरा येथील शिकोह पार्कमध्ये.